Mahayuti Poliitics : शिंदे-फडणवीसांमधील CM पदाचा पेच वाढला, केंद्रीय नेतृत्वालाच मध्यस्थी करावी लागणार?

Dispute over the post of CM of Maharashtra in Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्रि‍पदावर दावा ठोकला आहे. तर भाजपकडून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा पेच वाढला असून तो सोडवण्यासाठी आता केंद्रीय नेतृत्वालाच मध्यस्थी करावी लागणार असल्याचं दिसत आहे.
 Narendra Modi, Eknath Shinde,  Amit Shah, Devendra Fadnavis
Narendra Modi, Eknath Shinde, Amit Shah, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 27 Nov : विधानसभा निवडणुकीचा निकाल (Assembly Election Result) जाहीर होऊन आता चार दिवस उलटले तरी अद्याप महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरलेला नाही. बहुमत असलं तरी महायुती सरकारचा मुख्यमंत्री कोण एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? यावरून युतीत धुसफूस सुरू असल्याची माहिती आहे.

कारण भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. एकनाथ शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्रि‍पदावर दावा ठोकला आहे. तर भाजपच्या नेते आणि पदाधिकार्‍यांकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे राज्यातील मुख्यमंत्रिपदाचा पेच वाढला असून तो सोडवण्यासाठी आता केंद्रीय नेतृत्वालाच मध्यस्थी करावी लागणार असल्याचं दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर येत्या 1 ते 2 दिवसांत महाराष्ट्रातील नेते दिल्लीत किंवा दिल्लीतील केंद्रीय नेते महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्रि‍पदाचा पेच सोडवणार असल्याचे संकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून देण्यात आले आहेत. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसकडून देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) पाठिंब्याचे पत्र देखील दिल्याचं सांगितलं जात आहे.

विशेष म्हणजे केंद्रातील नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) केंद्रात मंत्रीपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्रिपदाची ॲाफर दिल्याची चर्चा आहे. केंद्रीय नेतृत्वाने ॲाफर दिली असली तरीही अद्याप राज्य पातळींवर कोणताही निर्णय न झाल्याने दिल्लीश्वरांच्या मध्यस्तीची गरज निर्माण झाली आहे.

 Narendra Modi, Eknath Shinde,  Amit Shah, Devendra Fadnavis
Eknath Shinde: "मुख्यमंत्रिपद देणार नसाल तर मला 'हे' पद द्या अन् श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा..!" शिंदेंच्या नव्या गुगलीने भाजप बुचकळ्यात?

शिवाय महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्यातील सत्ता स्थिर रहावी यासाठी भाजपच्या केंद्रातील नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपकडे बहुमताच्या जवळ जाणारे आकडे असतांनाही दोन मित्र पक्षांना सोबत घ्यावे लागणार आहे. या स्थितीत तिन्ही पक्षातील समन्वय टिकून ठेवण्याचा प्रयत्न केंद्रातील नेते करत आहेत.

 Narendra Modi, Eknath Shinde,  Amit Shah, Devendra Fadnavis
EVM Controversy: विरोधकांनी EVM विरोधात एल्गार करताच निवडणूक आयोगाचं मोठं स्पष्टीकरण, 'मतमोजणीच्या आकड्यात तफावत...'

शिवाय सर्वात मोठा पक्ष असतांनाही 2019 सारखी भाजपवर नामुष्कीची वेळ येऊ नये, याची विशेष काळजी देखील घेतली जात आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्रिपदाच्या निर्णयासाठी दिल्लीत बैठक कधी होणार याकडे महायुतीच्या नेत्यांना नजरा लागल्या आहेत. मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेसाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना अद्याप दिल्लीचं बोलावणं आलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्रि‍पदाचा सस्पेन्स कायम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com