Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंची कृती अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी ; अनिसंचा आरोप!

Eknath Shinde : मुखमंत्र्यांकडून झाली असेल तर हे बेजबादारपणाचे आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेने आरोप केले आहेत. शिंदे हे ज्योतिषांच्या दरबारी गेले आहेत, असे अनिसंने म्हंटले आहे. ज्योतिषाकडे जाऊन शिंदेंनी स्वत:चं आणि सरकारटं भविष्य पाहिलं असल्याचा आरोपही अनिसंने केला आहे. मुख्यमंत्र्यांची ही कृती बेजबाबदार असल्याचेही अनिसने म्हंटले आहे.

Eknath Shinde
Basavaraj Bommai : कर्नाटकचे मुख्यमंत्री पुन्हा बरळले ; सोलापूर आणि अक्कलकोटवर केला दावा

मुख्यमंत्री हे काल (२३ सप्टें) रोजी नाशिक दौऱ्यावर होते. कुटुंबासहित ते तिथे शिर्डीला साईबाबांच्या चरणा ते गेले होते. या दौऱ्यानंतर अनिसने आरोप केला आहे. शिर्डीत दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री सिन्नरच्या दिशेने जाताना दिसले. सिन्नरजवळ ईशान्येश्वर महादेवाचं मंदिर आहे. या देवास्थानचे सर्वेसेवा अशोक थोरात यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी सल्लामसलत केली.

खरात हे अंकशास्त्राचे जाणकार मानले जातत. खरात यांच्याकडे अनेक सेलिब्रिटी येऊन गेलेत, अनेक जण त्यांच्याकडे भविष्य पाहायला येतात. याचप्रकारे खरात यांनी मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन केले, असल्याचा आरोप अनिसने केला आहे.

Eknath Shinde
Udayanraje Bhosale : कोश्यारी, त्रिवेदी यांना पदावरून तात्काळ हटवा ; उदयनराजेंचे मोदींना पत्र!

यावर अनिसने म्हंटले आहे की, भविष्य पाहण्याची, अशी कृती जर संविधानिक पदावर असलेल्या मुखमंत्र्यांकडून झाली असेल तर हे बेजबादारपणाचे आहे. यामुळे अनिसकडून मुख्यमंत्र्यांचा निषेध नोंदवला आहे. यामुळे आता या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यावर विरोधक टीका करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.