Rahul Gandhi News : पवारांवर मोदींनी केलेल्या 'त्या' टीकेची राहुल गांधींनी पुण्यातूनच केली सव्याज परतफेड

Narendra Modi : रेवण्णाने 400 महिलांचा रेप केला. ही गोष्ट माहीत असूनही पंतप्रधान मोदी त्याच्यासाठी मत मागत होते. तेथील गृहमंत्री त्यावर काहीही बोलत नाहीत. त्याबाबत कुठल्याही प्रकारची चर्चा होत नाही.
Narendra Modi, Rahul Gandhi
Narendra Modi, Rahul GandhiSarkarnama

Maharashtra Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर भटकती आत्मा असा उल्लेख करून टीका केली होती. त्या टीकेची काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुण्यात येऊन सव्याज फरतफेड केली आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची गरिमा ठेवत नाहीत. ज्येष्ठ नेते असलेल्या पवारांवर त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, अशा शब्दात राहुल यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर Ravindra Dhangekar यांच्या प्रचारार्थ राहुल गांधींची शुक्रवारी (ता. 3) सभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजपच्या धोरणांवर सडकून टीका करत मोठ्या घोषणा जाहीर केल्या. यावेळी त्यांनी पवारांवर टीका करणाऱ्या मोदींनाही लक्ष्य केले.

राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदींनी Narendra Modi आपल्या पदाची गरिमा बाळगत नाहीत. त्यांनी ज्येष्ठ नेते पवारांवर खालच्या पातळीवर टीका केली. ज्यावर बोलायचे ते बोलत नाहीत, आणि नको त्या गोष्टींवर बोलून लोकांची दिशाभूल करतात. महाराष्ट्र ही काँग्रेसची भूमी आहे. या राज्यातील लोकांच्या ह्रदयात काँग्रेसची विचारधारा आहे. राज्यातील रक्तात महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, नेहरुंची विचारधारा आहे.

Narendra Modi, Rahul Gandhi
Rahul Gandhi Pune : मोदी सरकार फक्त 5 टक्के लोकांची काळजी घेते; राहुल गांधींचा गंभीर आरोप

कर्नाटकमधील बलात्कारी रेवण्णासाठी पंतप्रधान मोदी मते मागतात, याकडे गांधींनी लक्ष्य वेधले. ते म्हणाले, रेवण्णाने 400 महिलांचा रेप केला. ही गोष्ट माहीत असूनही पंतप्रधान मोदी त्याच्यासाठी मत मागत होते. तेथील गृहमंत्री त्यावर काहीही बोलत नाहीत. त्याबाबत कुठल्याही प्रकारची चर्चा होत नाही. मोदी पाकिस्तानवर बोलतील. समुद्राखाली जाऊन नाटक करतील, मात्र कुठल्याही समस्यांवर बोलणार नाहीत, असा समाचारही राहुल यांनी घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi, Rahul Gandhi
Amol Kolhe Vs Adhalrao Patil : भाजप नेत्यानं ठरवलं; 'आता त्यांची 'कोल्हे कुई' थांबवायचीय!'

महाराष्ट्रात पेपर लिक होण्याचे प्रमाण वाढले आहे. असे असतानाही त्यातील आरोप राजरोसपणे दुसरे गुन्हे करताना स्पष्ट होत आहे. यावर बोलताना राहुल गांधी Rahul Gandhi म्हणाले, राज्यात स्पर्धा परीक्षेचे पेपर लिक होतात. यातून बेईमानी करणारे पास होतात आणि इमानदार विद्यार्थी मागे राहतात. त्यामुळे असे प्रकार करणाऱ्या लोकांवर आमचे सरकार कडक कारवाई करणार आहे. त्यामुळे क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांचा सरकारी नोकरीत स्थान देण्याचे आमचे आश्वासन आहे, असेही गांधी म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

Narendra Modi, Rahul Gandhi
Sushma Andhare : एक मोठा धडाम आवाज अन् त्यानंतर स्मशान शांतता; हॅलिकॉप्टर क्रॅशचा अंधारेंनी सांगितला थरार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com