शिंदे-भाजपची बहुमत चाचणी: मुनगंटीवारांनी मांडला विश्वासदर्शक प्रस्ताव

मतदानास सुरवात होत आहे.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama/
Published on
Updated on

मुंबई : विधानसभा सभागृहात आज भाजप-शिंदे गटाची बहुमत (eknath shinde government)चाचणी होणार आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या 16 आमदारांना शिंदे गटाकडून व्हीप बजावण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे व्हीपचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वासाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर मतविभागाची मागणी करण्यात आली. मतदानास सुरवात होत आहे. (Floor Test LIVE updates)

विधानसभेच्या कामकाजास सुरुवात. भाजपकडून सुधीर मुनगंटीवारांनी मांडला विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला. शिंदे गटाने जारी केलेल्या व्हीपविरोधात शिवसेनेकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. विधानसभा अध्यक्षांना या व्हीपला मान्यता देण्याचा अधिकार नाही.

Sudhir Mungantiwar
शिंदे गट विधीमंडळ पक्ष कार्यालय ताब्यात घेणार ?

उद्धव ठाकरे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत, असा मुद्दा त्यांनी मांडला. मात्र, 11 जुलैच्या सुनावणीतच यावर निर्णय होईल, असे न्यायालय म्हणाले. त्यामुळे व्हीपबाबत शिवसेनेला दिलासा मिळू शकला नाही.

संतोष बांगर यांनी कालच विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत मविआ उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने मतदान केले होते. मात्र, आज अचानक त्यांनी आपली बाजू बदलली आहे. दुसरीकडे, बहुमत चाचणीसाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना शिंदे गटाकडून व्हीप बजावण्यात आला आहे. तर शिवसेनेकडूनही प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्व आमदारांना व्हीप बजावला आहे. त्यामुळे व्हीपवरुन आजही शिंदे गट व शिवसेनेमध्ये संघर्ष पाहण्यास मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Gangster Murder Mystery
Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com