Eknath Shinde News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड यांना शनिवारी विवियाना मॉल प्रेक्षक मारहाणी प्रकरणी जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. मात्र, आज, रविवारी ठाण्यातील कळवा पुलाचे उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) एकाच मंचावर पाहायला मिळाले. या सोहळ्यात शिंदे-आव्हाडांनी एकमेकांना चांगल्याच कोपरखळ्या लगावल्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा होत आहे.
ठाण्यातील कळवा पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असलेल्या जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री शिंदे चांगलीच जुगलबंदी रंगली. आव्हाड बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना टपली लगावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले, 'आम्ही जनतेचे काम करणारे आहोत. ज्यात लोकांचा फायदा तेच काम आपल्याला करायचे आहे'.
शिंदे झालेल्या कामांची माहिती देत असताना आव्हाडांकडून देखील काम पूर्ण झाले असल्याचे सांगितले. त्यावर शिंदे यांनी तांत्रिक बाबींविषयी बोलत असल्याचे सांगितले. तर यावेळी जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) देखील पूलाच्या कामावरून मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला.
यावेळी आव्हाड म्हणाले, दोन प्रमुख मागण्या आम्ही पूर्वीपासून करतो आहोत. कळव्यात उतरतो तिथून लेफ्ट टर्न घेऊन आठ लेनचा हायवे येतो. त्याला जॉईन केला तर टोलनाक्यापर्यंत रस्ता चांगला होईल. यामुळे जे कळव्यात, खारेगावला जाणारी आहेत ती इथून जाणार नाहीत. म्हणजे कळव्याचे ट्रॅफिक जॅम कमी होईल, त्यामुळे ट्रॅफिकचा प्रश्न कमी होईल. ही विनंती मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच वर्षांपूर्वी केली होती. आता मुख्यमंत्री शिंदे यांनाही विनंती करतो.
यावर खासदार शिंदे म्हणाले, अडीच वर्षे सरकारमध्ये असताना काय केले. खासदार शिंदे यांच्या प्रश्नाला उत्तर देता आव्हाड म्हणाले, अडीच वर्षे कोविडमध्ये होती ना. यावर स्टेजवर एकच हशा पिकला. तसेच विभाग एकनाथ शिंदे यांच्याकडे होता. बोलायला लावू नका, असे आव्हाड म्हणतातच शिंदे यांनी आव्हाड यांना टपली मारली, यामुळे व्यासपिठावर चांगलाच हशा पिकला, यावरुन उपस्थितांना आव्हाड आणि शिंदे यांच्यातील मैत्रीचा प्रत्य आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.