Eknath Shinde News : '...म्हणून शिवसेनेच्या सर्वच्या सर्व 15 जागा निवडून आणणार!'; CM शिंदेंना कॉन्फिडन्स

Loksabha Election 2024 : 'आमच्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची स्पर्धा होती. तिकीट एकच असल्याने निर्णय घेताना मोठी कसरत झाली...'
CM Eknath Shinde News
CM Eknath Shinde News Sarkarnama

Mumbai News : लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचे चार टप्पे आत्तापर्यंत पार पडले आहेत.तर तीन टप्प्यांचं मतदान अद्याप बाकी आहे. या निवडणुकीच्या धामधुमीत भाजपनं देशात चारशे पार तर महाराष्ट्रात मिशन 45 साठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे.तसेच ज्याप्रमाणे ही निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आहे त्याहून अधिक एकनाथ शिंदे आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी महत्त्वाची आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतरची ही सर्वात मोठी निवडणूक आहे. पण त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे.

महायुतीत भाजप सर्वाधिक 28 तर त्याखालोखाल एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला (Shivsena) 15 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 4 तर रासप 1 जागेवर लढत आहे. शिंदेंना 8 ते 9 जागा मिळतील अशी अपेक्षा असतानाच त्यांनी 15 मिळवून महायुतीत आपला दबदबा कायम असल्याचे दाखवून दिले.पण या जागांवर शिंदेंच्या उमेदवारांसमोर उद्धव ठाकरेंनी तगडं आव्हान उभे केले आहे.पण तरीदेखील शिंदेंनी आपल्या सर्वच्या सर्व 15 जागा निवडून येणार असल्याचा दावा केला आहे.

CM Eknath Shinde News
Tihar Jail News: ऐन निवडणुकीच्या काळात तिहार तुरुंग रडारवर? बॉम्ब हल्ल्याच्या धमकीमुळे प्रशासनाची धावपळ

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपण आतापर्यंत खूप कामं केली असून गेल्या दोन वर्षांमध्येही अनेक कामं मार्गी लावली आहेत. त्या कामाच्याच जोरावर आपण शिवसेनेचे सर्व 15 उमेदवार निवडून आणणार आहे, असा कॉन्फिडन्स व्यक्त केला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका कार्यक्रमात बोलत होते.

शिंदे म्हणाले, आमच्याकडे उमेदवारांची स्पर्धा होती. तिकीट एकच असल्याने निर्णय घेताना मोठी कसरत झाली.उलट उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात आणि मुंबईत कोणतीही सहानुभूती नसून येत्या 4 जूनला लोकांच्या भावना कुणासोबत आहेत हे समजेल. मी जे बोलतो त्याला पुरावे आहेत, ये पब्लिक है, सब जानती हे, काम करणाऱ्याच्या मागे लोक राहतात असे मत व्यक्त करतानाच त्यांनी महायुतीच्या 45 पेक्षा जास्त जागा निवडून येतील असा दावाही केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीकेची झोड उठवली आहे.ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात विकासकामांना लागलेला ब्रेक आम्ही सत्तेत आल्यानंतर या अडीच वर्षांमध्ये उखडून टाकला.पण ज्यांना दिवस-रात्र,उठता-बसता खोक्यांशिवाय चैन पडत नाही, त्यांना खोक्याची आठवण येते. यांना खोके नाही तर कंटेनर लागतात हे माझ्याशिवाय जास्त कुणाला माहिती असणार आहे.मी आरोपांना कामाने उत्तर देतोय, हे लोकांना आवडत असून त्याचमुळे गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महायुती राज्यात एक नंबरला आली असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

CM Eknath Shinde News
Dheeraj Wadhawan Arrest : DHFL मध्ये तब्बल 34000 कोटींचा घोटाळा; धीरज वाधवनला CBIकडून अटक, काय आहे प्रकरण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com