Eknath Shinde News: राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड: एकनाथ शिंदेंनी तातडीनं गाठली दिल्ली, PM मोदींच्या भेटीसाठी रवाना, भाजपवर पुन्हा नाराजी की..?

Eknath Shinde Meet PM Modi: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे.सध्या महायुतीत पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या जागेवरून महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात तिढा निर्माण झाला आहे.
Eknath Shinde PM Narendra Modi
Eknath Shinde PM Narendra ModiSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News: राज्यात सध्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आल्याचं दिसून येत आहे. अशातच राज्याच्या राजकारणात आणि महायुतीतून सर्वात मोठी राजकीय अपडेट समोर येत आहे.उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंनी सोमवारी(ता.5 ऑक्टोबर) तातडीनं दिल्ली गाठली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे.सध्या महायुतीत पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या जागेवरून महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात तिढा निर्माण झाला आहे. या जागेसाठी भाजपनं उमेदवारी जाहीर केल्यानंतर शिंदेंनी मंगेश चिवटे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापणार आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर शिंदे दिल्लीत दाखल झाले असून ते मोदींचीही भेट घेणार आहे. यामुळे शिंदेंच्या या दिल्ली दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.

विधान परिषदेच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पदवीधर, पुणे पदवीधर,नागपूर पदवीधर,अमरावती शिक्षक आणि पुणे शिक्षक असे पाच उमेदवार या निवडणुकीमुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. या निवडणुकीसाठी येत्या 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार आहे. तर या निवडणुकांची मतमोजणी 27 ऑक्टोबरला होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 5 ऑक्टोबर ही अंतिम तारीख आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही नेत्यांच्या या भेटीदरम्यान राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यातही या दोन्ही नेत्यांच्या भेटीत संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde PM Narendra Modi
Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर; कॅबिनेट मंत्री हरदीपसिंग पुरींसह आणखी एका मंत्र्याचा पत्ता कट

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाचा सात ऑक्टोबर रोजी रौप्य महोत्सव साजरा होत आहे.त्याच धर्तीवर एनडीएच्या घटक पक्षांतील नेत्यांशी पंतप्रधान चर्चा करताना दिसून येत आहे. तसेच या भेटीत राज्यात विधान परिषदेच्या जागा वाटपातील तिढ्यावरही दोन्ही नेते संवाद साधण्याची शक्यता आहे. शिंदे हे या बैठकीत मोदींसमोर राज्यातील दुष्काळी परिस्थिती मांडणार असल्याचं बोललं जात आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघात आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मंगेश चिवटे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय सचिन सानप हे आपआपल्या उमेदवारीवर ठाम असल्याचं दिसून येत आहे. भाजपने पुणे शिक्षकसाठी कौस्तुभ गावडे आणि पुणे पदवीधरसाठी डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Eknath Shinde PM Narendra Modi
Farmer Loan Waiver : शेतकऱ्याने आयुष्य संपवल्यास बँकाना जबाबदार धरणार, महसूलमंत्री बावनकुळे यांचा इशारा ; कर्जवसुलीसाठी तगादा न लावण्याच्या सूचना

त्याचमुळे आता पुणे शिक्षक भाजपकडे गेल्याने शिवसेनेचे मंगेश चिवटे यांच्या दाव्याला मोठा धक्का बसला. मात्र,त्यांना शिंदे यांनी नामनिर्देशन दाखल करण्याचे निर्देश दिले असल्याचं ते म्हणताहेत. यामुळे पुणे शिक्षकमध्ये महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यताआहे. त्याचमुळे मोदींना भेटून शिंदे हाच मार्गी लावणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com