Shinde Sena Upset In Mahayuti : महायुतीत शिंदेसेना पुन्हा नाराज; फडणवीसांच्या गृहविभागाने घेतलेल्या ‘त्या’ निर्णयाचा सर्वाधिक फटका बसणार

VIP Security Issue : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहविभागाने राज्यातील व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे, त्यात ज्यांच्या जिवाला धोका नाही, अशा व्यक्तींच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. त्यात सत्ताधारी आमदारांचाही समावेश आहे.
Devendra Fadnavis-Eknath Shinde
Devendra Fadnavis-Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 18 February : राज्यात सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. त्या आढाव्यातून ज्यांच्या जीवाला धोका नाही, अशा नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे, त्याचा सर्वाधिक फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारांना बसला आहे. कारण गुवाहाटीवरून आल्यानंतर शिंदेसेनेतील आमदारांना वाय दर्जा सुरक्षा देण्यात आली होती. त्यात कपात करण्यात आल्याने शिंदे सेनेतील नेत्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे.

शिवसेनेत उभी फूट पाडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ४० पेक्षा जास्त आमदार सूरतमार्गे गुवाहाटीला गेले होते. त्या वेळी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांवर गद्दार म्हणत शेलक्या शब्दांत टीका करण्यात येत होती. तसेच, गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी मुंबईत येऊन दाखवावं, असे आव्हान दिलं होतं. त्यामुळे एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना विशेष सुरक्षा पुरविण्यात आली होती.

शिंदे सेनेतील प्रत्येक आमदाराला (MLA) वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यामध्ये प्रत्येक आमदारासोबत एक पोलिस गाडी बंदोबस्तासाठी असायची. तसेच या आमदारांच्या घरांना सुरक्षा देण्यात आली होती, त्यामुळे आमदाराच्या घराबाहेर पोलिस असायचे, त्यामुळे शिंदेंच्या आमदारांना व्हीआयपी संस्कृती सवय झाली हेाती.

Devendra Fadnavis-Eknath Shinde
Madha Politic's : अकलूजचे धैर्यशील अन्‌ फलटणचे रणजितसिंह यांना एकमेकांशेजारी बसविण्यासाठी शहाजीबापूंची धडपड!

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहविभागाने राज्यातील व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे, त्यात ज्यांच्या जिवाला धोका नाही, अशा व्यक्तींच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. त्यात सत्ताधारी आमदारांचाही समावेश आहे. नव्या निर्णयामुळे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. मात्र, सर्वाधिक फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आमदारांना बसणार आहे.

Devendra Fadnavis-Eknath Shinde
Jaykumar Gore : भाजपश्रेष्ठींनी सोलापूरला पालकमंत्री म्हणून का पाठवले? खुद्द गोरेंनीच कारण सांगितले; ‘पक्षश्रेष्ठींनी फार विचारपूर्वक पाठवलंय...’

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारांची वाय दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. त्याऐवजी आता शिंदेसेनेतील आमदारांसोबत आता केवळ एक पोलिस कर्मचारी असणार आहे. मात्र, फडणवीस यांच्या गृहविभागाने घेतलेल्या या निर्णयावर शिंदेसेनेतील आमदारांकडून तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com