Mumbai News : अनंत अंबानींच्या लग्नात बॉम्बची धमकी देणारी सोशल मीडियात पोस्ट केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुजरातमधील 32 वर्षीय अभियंत्याला अटक केली. समाज माध्यमावरील 'एक्स' खात्यावर लग्न सोहळ्यातील बॉम्बची धमकीची माहिती देणारी एक पोस्ट शेअर करण्यात आली होती.
मुंबई पोलिसांनी यात रविवारी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता. पण धमकी देणाऱ्याचा शोधाला मुंबई पोलिसांनी प्राथमिकता दिली आणि त्यात यश आले.
आशियातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक मुकेश अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी यांच्या लग्नसोहळ्यात बॉम्बची धमकीची सोशल मीडियात पोस्ट करण्यात आली होती. 'मनात एक विचित्र विचार आला आहे, की जर अंबानीच्या लग्नात बॉम्ब फुटला, तर मध्यरात्रीच जगात उलाढाल होईल. कोट्यवधी रुपये स्वाहा होतील', असे संबंधित अभियंत्याने पोस्टमध्ये लिहिले होते. या पोस्टमुळे मुंबई पोलिस अलर्ट मोडवर गेले आणि पोस्ट शेअर करणाऱ्याचा शोध घेण्याबरोबरच अंबानींच्या विवाहस्थळी पोलिस बंदोबस्तात वाढ केली.
गुजरातच्या या अभियंत्याने मुंबई पोलिसांना (Police) ही पोस्ट शेअर केली होती. FFSFIR नावाच्या युजरने शेअर केली होती. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून पोस्ट शेअर करणाऱ्याचा शोध सुरू करण्यात आला. याबाबत उच्च कोटीची गुप्तता बाळगण्यात आली होती. रविवारी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे देखील वृत्त पोलिसांनी बाहेर येऊ दिले नाही.
या पोस्टनंतर मुंबई पोलिसांनी विवाहस्थळाच्या आसपासच्या परिसरातील सुरक्षितेत अधिक वाढ करण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्तात वाढ केली. सुरक्षितेचा आढावा घेताना बॉम्बची धमकी ही अफवा असल्याचे सांगितले जात होते. परंतु पोलिसांनी कुठलीही ढिलाई केली नाही आणि गुजरातमधील अभियंत्याला अटक केली.
दरम्यान, अंबानींच्या लग्नसोहळ्यात दोन जणांनी घुसखोरी केली. अनंत-राधिकाच्या शनिवारी 13 जुलैला लग्नसोहळ्यातील शुभ आशीर्वाद कार्यक्रमात हा प्रकार झाला. एक युट्यूबर होता, तर दुसरा आंध्र प्रदेशातील एक व्यावसायिक होता. या दोघांनही सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेत पोलिसांकडे दिले. दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर नोटिस देखील बजावली आहे. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील दिग्गज कलाकार, राजकीय नेतेमंडळी आणि धार्मिक महंतांची उपस्थिती होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.