मुंबई : एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या (Presidential Election 2022) उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना शिवसेनेसोबत बंड केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या सोबत आलेल्या आमदारांचा पाठिंबा जाहीर केला आहे. यानंतर लगेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. दरम्यान मुर्मू या आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मात्र त्या या दौऱ्यात ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी जाणार नाहीत, अशी माहिती मिळत आहे.
याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारण्यात आले असता. यावर बोलतांना ते म्हणाले की, त्यांच्या दौऱ्याची जी माझ्याकडे पत्रिका आली त्यामध्ये, असे काही नियोजन नाही, असे त्यांनी सांगितले. त्यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कुणाला पाठिंबा देणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या आणि खासदारांच्या भावनेचा आदर करून मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता. यानंतर आता मुर्मू या आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी त्या ठाकरे यांना भेटण्यासाठी 'मातोश्री'वर जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, फडणवीसांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून त्यांची मातोश्रीवर जाण्याची शक्यता कमी झाली आहे.
आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांना याबाबत माध्यम प्रतिनिधीने प्रश्न विचारला. त्यावर फडणवील म्हणाले की, मुर्मू या मुंबईत येत आहेत. मात्र, त्यांची जी कार्यक्रम पत्रिका मला मिळाली त्यामध्ये तरी 'मातोश्री'वर जाण्याबाबत नियोजन करण्यात आलेले नाही, त्यामुळे त्या 'मातोश्री'वर जाणार नाहीत, असे बोलले जात आहे. तर दुसरीकडे मुर्मू यांच्या या दौऱ्यादरम्यान भाजप आणि शिंदे गटासह अनेक नेते त्यांना भेटणार आहेत. यामुळे मुर्मू यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे.
दरम्यान, दोन दिवसापुर्वीच ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना ही कोत्या मनाची नाही म्हणत मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता. पाठिंबा देण्यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता. मुर्मू या आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करत असल्याने आमच्या पक्षातील काही आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नेत्यांनी त्यांना देशाचे राष्ट्रपतीपद भूषवण्याची संधी मिळत असल्याने आपण पाठिंबा द्यायला हवा, अशी विनंती केली होती त्यामुळे आपण पाठिंबा दिल्याचे स्पष्ट केले. तसेच, शिवसेनेने याआधीही पक्षाच्या पलिकडे जाऊन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता, असेही त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.