

Bharat Gogavale on Election Expenses : देशात आता निवडणुका या सोप्या राहिलेल्या नाहीत, त्या खूपच खर्चिक बनल्या आहेत. पैशांशिवाय निवडणुका हा विचारही आता कोणी करु शकत नाही. याच पार्श्वभूमीवर मुंबईत बाहेरुन मतदार आणण्यासाठी खूप खर्च करावा लागतो अशा आशयाचं खळबळजनक विधान शिंदेसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी केलं आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरेंनी निवडणुकांमध्ये खर्च केला नाही या मुद्यावर बोलताना आपल्या खर्चाचाही उल्लेख केला.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला ज्या पद्धतीचं यश मिळालं आहे ते केवळ पैशांचा महापूर आल्यानं मिळालं आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आला होता. या आरोपाला उत्तर देताना भरत गोगावले म्हणाले, खर्च करण्यासाठी त्यांचे कोणी हात धरलेत? त्यांनीही खर्च करावा. ते जर सेव्हिंगलाच पैसे ठेवत असतील तर पैसे वाटावे लागतात. त्यात कार्यकर्ते आहेत, सत्ता आणायची आहे, त्यात गाडीभाडं इतर खर्च असतात तर हे खर्च त्यांनीही करावेत ना.
पैशाचा महापूर आला म्हणजे मतदारांना पैसे वाटले असं काही आहे का? त्यांना वाटत असेल तर त्यांनी असं एखादं उदाहरण पकडून दाखवावं. ठाकरे सेव्हिंगमध्ये पैसे ठेवतात आम्ही कार्यकर्त्याला जर अडचण आली तर त्याच्या मागे उभं राहतो. त्यामुळं ही सत्ता आमच्याकडं येत चालली आहे. ठाकरे आपल्या कुटुंबासाठी सेव्हिंग करतात, हे पैसे कुठे ठेवतात? याचाच आम्ही आजही विचार करतो आहोत. आम्ही एकत्र असतानाही त्यांनी आम्हाला कधी पैसे दाखवले नाहीत.
या निवडणुकीला किती खर्च आला? या प्रश्नावर असा खर्च सांगायचा नसतो, तुम्ही तपासायचा असतो असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. निवडणुका आता सोप्या राहिलेल्या नाहीत, खासकरुन आम्हाला खर्च येतो तो म्हणजे आमचे मतदार जे मुंबई, पुणे, ठाणे, गुजरात इथं असतात त्यांना नेण्या-आणण्याची व्यवस्था करावी लागते त्यामुळं खर्च हा येतोच. बाकी आम्ही जी काही कामं करतो, लोकांना सामोरं जातो, लोकांच्या अडीअडचणीला उभं राहतो त्यामुळं लोक आम्हाला निवडून देतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.