मलिकांचा गैाप्यस्फोट ; सॅम डिसोझा हा वानखेडेंचा ड्रग्ज डीलर

मलिक म्हणाले. ''कार्डिलिया ड्रग्ज प्रकरणी NCBचे अधिकारी समीर वानखेडे यांनी तक्रारी केल्या आहेत. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलिसाकडून (SIT) तपास सुरू आहे. सॅम डिसोझा यांची व्हिडिओ क्लिप आम्ही दाखवली होती,''
Nawab Malik
Nawab MalikSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ''पैशाचा वापर करुन सरकार पाडता येत नाही. मलाही वारंवार ईडीकडून धमकवण्यात येत आहे. पर्याय संपतात तेव्हा दंगली घडविल्या जातात. ही भाजपच्या जुनी पद्धत आहे. भाजपनं नकारात्मक राजकारण करु नये,'' असे राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मलिकांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंबाबत (Sameer Wankhade) गैाप्यस्फोट केला.

''मालेगावचा अटक झालेला नगरसेवक हा राष्ट्रवादीचा नसून तो एमआयएमचा आहे,'' असे मलिक म्हणाले. ''कार्डिलिया ड्रग्ज प्रकरणी NCBचे अधिकारी समीर वानखेडे यांनी तक्रारी केल्या आहेत. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलिसाकडून (SIT) तपास सुरू आहे. सॅम डिसोझा यांची व्हिडिओ क्लिप आम्ही दाखवली होती,''

''सॅम डिसोझा यांनी दिल्लीत पैसे दिल्याची माहिती दिली आहे. सॅम डिसोझा यांनी वानखडे निर्दोष असल्याचे सांगत आहे. सॅम डिसोझा हा समीर वानखेडेंचा प्रायव्हेट ड्रग्ज डीलर आहे. क्रूझ वरील पार्टीचा आयोजक काशिफ खान होता. काशिफ खान याला अजून का पकडण्यात आले नाही. काशिफ खान हा गोव्यात आहे," अशी माहिती मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Nawab Malik
NCBची मोठी कारवाई : १५०० किलो गांजा जप्त, दोघे ताब्यात

काही दिवसापूर्वी पुण्यातील ईडीच्या छापेमारीवर मलिक यांनी स्पष्टीकरणं दिले होते. वक्फ बोर्डावर छापे पडल्याचे वृत्त तथ्यहीन असल्याचे त्यांनी सांगितले. '' वक्क बोर्डचे काम पारदर्शक पद्धतीनं सुरु आहे. जुने कागदपत्र स्कॅन करण्याचे काम सुरु आहे. ईडी (ED) माझ्या घरी आली तर मी त्यांचे स्वागत करेल. वक्फ बोर्ड माझ्याकडे आल्यानंतर पारदर्शक कारभार कसा होईल, यासाठी जुन्या कागदपत्राचे स्कँन सुरु आहेत. राज्यात 30 हजार वक्फ बोर्डाच्या संस्था आहेत, त्याची ईडीनं चौकशी करावी. ईडीचे स्वागत आहे,'' असे मलिक म्हणाले होते.

सत्तेसाठी पटोले तलवार म्यान करतात ; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

मुंबई : ''महाविकास आघाडी सरकार हिवाळी अधिवेशनापासून पळ काढण्याचा प्रयत्न करीत आहे. अधिवेशनात एसटी कर्मचारी व अन्य अनेक विषय असल्यामुळे सरकार पळ काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. हिवाळी अधिवेशनात आम्ही भूमिका घेण्यापेक्षा कॉग्रेसने भूमिका घेतली पाहिजे, कारण कॉग्रेसला विदर्भातील जनतेने जनाधार दिला आहे,'' असे मत विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी व्यक्त केले. ते माध्यमांशी बोलत होते. दरेकरांनी यावेळी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com