Raj Thackeray : मोदींचा हटवलेला फोटो, शाहांवरील टीका खटकली, फडणवीस- शिंदेंनी राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर बाप्पांच्या दर्शनाला जाणं टाळलं ?

Raj Thackeray Shivtirth Ganpati : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी दीड दिवसांचा गणपती बाप्पा विराजमान होत असतो.दरवर्षी या काळात त्यांच्या घरी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, भाजप, शिवसेना यांसह विविध पक्षांतील अनेक दिग्गज व्यक्तिमत्व बाप्पांच्या दर्शनासाठी येत असतात.
eknath shinde devendra fadnavis raj thackeray .jpg
eknath shinde devendra fadnavis raj thackeray .jpgsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या घरी अर्थात 'शिवतीर्थ'वर गणेशोत्सवाच्या निमित्त गणपती दर्शनाला दरवर्षी अनेक नेतेमंडळी,कलाकार तसेच इतर मान्यवर मंडळीही आवर्जून हजेरी लावत असतात. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राज ठाकरेंकडे बाप्पांच्या दर्शनाला येत असतात.मात्र,फडणवीसांपाठोपाठ शिंदेंनीही यंदा गणेश दर्शनाकडे पाठ फिरवली की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरेंच्या घरी गणेशोत्सवात जाणं टाळल्यामुळे राजकीय मतभेदाची चर्चा जोर धरू लागली आहे. दरवर्षी वेळात वेळ काढून फडणवीस-शिंदे हे राजकारणा पलिकडची मैत्री जपताना दिसून येतात.

मात्र, काही दिवसांपूर्वीच मनसे नेते अमित ठाकरे यांनी पुण्यातील सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राध्यापकांच्या कार्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढून तो तिथून हटवण्यास लावला होता.

तर राज ठाकरेंनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जहाल शब्दांत टीका केली होती. त्याचमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या घरी दर्शनाला जाणं टाळल्याची चर्चा आहे.मोदी-शाह यांच्यावरच टीका केल्यानं मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे दुखावले गेल्याची चर्चा आहे.

eknath shinde devendra fadnavis raj thackeray .jpg
Kolhapur News: भाजपविरोधात मुश्रीफांनी दंड थोपटले! कोल्हापूर, सांगलीत राजकीय बॉम्ब टाकून पश्चिम महाराष्ट्रात सवता सुभा मांडण्याचे संकेत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी दीड दिवसांचा गणपती बाप्पा विराजमान होत असतो.दरवर्षी या काळात त्यांच्या घरी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, भाजप, शिवसेना यांसह विविध पक्षांतील अनेक दिग्गज व्यक्तिमत्व बाप्पांच्या दर्शनासाठी येत असतात. यंदाही क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसह अनेकांनी राज ठाकरेंच्या घरी बाप्पांचे दर्शन घेतले. मात्र, मुख्यमंत्री शिवतीर्थवर गेले नसल्यामुळे काहींच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com