Captain Smit Machchhar Ashoka Chakra : कॅप्टन स्मित मच्छार यांना अशोक चक्र का द्यावे? 174 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या वैमानिकासाठी मोठी मागणी

Milind Deora seeks Ashoka Chakra for Captain Smit Machchhar after flydubai flight bravery : शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्याची मागणी केली
Captain Smit Machchhar Ashoka Chakra
Captain Smit Machchhar Ashoka ChakraSarkarnama
Published on: 
Updated on: 

Milind Deora letter to PM Modi for Smit Machchhar : फ्लायदुबई विमानातील 174 प्रवाशांचे प्राण वाचविणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांना देशाचा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार अशोक चक्र प्रदान करावा, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी केली आहे.

याबाबत देवरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

कॅप्टन स्मित मच्छार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रभावीपणे संभाव्य दहशतवादी हल्ला टाळला आणि विमानातील प्रवाशांचे प्राण वाचवले, असे खासदार मिलिंद देवरा यांनी पत्रात म्हटले आहे. त्यांच्या या धाडसाची दखल घेऊन त्यांना लवकरात लवकर अशोक चक्राने सन्मानित करावे, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान मोदींकडे (Narendra Modi) केली आहे.

स्वतःचा जीव धोक्यात घालून निरपराध नागरिकांचे प्राण वाचविण्याचे धैर्य कॅप्टन स्मित मच्छार यांनी दाखवले आहे. त्यांच्या शौर्याचा अशोक चक्रासारख्या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मान केल्यास भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा मिळेल, असेही शिवसेनेचे (Shivsena) खासदार देवरा यांनी पत्रात नमूद केले आहे.

Captain Smit Machchhar Ashoka Chakra
Ahilyanagar DCC Bank Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी 369 अर्ज; गडाख बिनविरोध निश्चित, घुलेंसमोर पेच, विखेंसमोर घोगरेंचे आव्हान, तर थोरातांच्या जावयाचा मार्ग सोपा?

कॅप्टन स्मित यांच्या धाडसाचे यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले आहे. स्मित यांनी दाखवलेल्या साहसामुळे 9/11 सारखा दहशतवादी हल्ला टाळण्यात मदत झाली, असा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही कॅप्टन स्मित मच्छार यांचा उल्लेख ‘हिरो’ असा केला आहे.

Captain Smit Machchhar Ashoka Chakra
MPSC Protest Pune : MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; आदित्य ठाकरेंचा आयोगाध्यक्षांवर हल्लाबोल, राहुल गांधींची चर्चा

चेंबूरचे रहिवासी

कॅप्टन स्मित मच्छार हे मुंबईतील चेंबूरचे रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या वैमानिक कारकीर्दीची सुरुवात स्पाइसजेटमधून केली. त्यानंतर गेल्या चार वर्षांपासून ते फ्लायदुबई या विमान कंपनीत वैमानिक म्हणून कार्यरत आहेत. अनेक वर्षांपासून ते दुबईत वास्तव्यास असून सुट्यांच्या काळात ते मुंबईत येतात. कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याची बातमी समोर आल्यानंतर चेंबूरमध्येही त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. ते पूर्णपणे बरे होऊन भारतात परतल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येईल, अशी भावना चेंबूरकरांनी व्यक्त केली आहे.

आता अशोक चक्राची मागणी

फ्लायदुबई विमानातील प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी कॅप्टन स्मित मच्छार यांनी दाखवलेल्या धाडसाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात आहे. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कौतुकानंतर आता त्यांना अशोक चक्र देण्याची मागणी पुढे आली आहे. मिलिंद देवरा यांच्या पत्रामुळे या मागणीला राजकीय पातळीवरही महत्त्व प्राप्त झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com