Mumbai Political News: शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह बुधवारी शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश केला. वाकचौरे यांनी 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. याचवेळी वाकचौरेंनी आपली चुक मान्य करत, विविध पक्षात आपण गेलो. मात्र, झालेल्या चुकीबाबत उद्धव ठाकरे यांची माफी मागतो, असे म्हणत यापुढे शिवसेनेला दिल्लीपर्यंत पोहचविणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी वाकचौरे यांचे स्वागत करत माफी मागायची गरज नाही. शिवसैनिक चुकीला माफी देतो. मात्र, पापाला माफी देत नाही, असे म्हणत नाव न घेता शिंदे गटालाही टोला लगावला. आता शिवसेनेचा आवाज दिल्लीचे तक्त हलवल्या शिवाय राहणार नाही. राजकारणात श्रद्धा व सबुरी हवी. मात्र, जे दिल्लीत बसलेत त्यांना सबुरी अजिबात नाही, अशी टीका ठाकरेंनी भाजपवर केली.
आता ज्यावेळी आपण शिर्डीला येऊ, तेव्हा साईबाबांचे दर्शन घेऊन सभाही घेऊ. भाऊसाहेब वाकचौरे हे चुकीने पक्ष सोडून गेले होते. त्यांनी चूक केली होती, पण पाप केले नव्हते. वाकचौरे यांनी 'मातोश्री'वर कधीही आरोप केले नाही, असे म्हणत ठाकरेंनी शिर्डीत सभा घेण्याचा शब्दही वाकचौरेंना दिला. त्यामुळे आता लवकरच ठाकरेंची शिर्डीत सभा होण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी आढावा बैठकांचा धडाका लावला आहे. यातच शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरेंना बळ मिळणार आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.