Jitendra Awhad: पडळकरांसोबतचा वाद टोकाला; जितेंद्र आव्हाडांचं अधिवेशनातूनच खळबळ उडवणारं ट्विट! म्हणाले,'7218395007 ह्या नंबरवरुन...

Maharashtra Vidhansabha Adhiveshan : विधिमंडळाच्या आवारातच बुधवारी (ता.16) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर एकमेकांना भिडल्याचं दिसून आलं.
Jitendra Awhad Vs Gopichand Padalkar .jpg
Jitendra Awhad Vs Gopichand Padalkar .jpgSarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात बातमी:

  1. विधिमंडळ परिसरात वाद: राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्यात मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात जोरदार वाद झाला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  2. जीवाची धमकी: वादानंतर जितेंद्र आव्हाड यांना एका अनोळखी नंबरवरून जीवे मारण्याची धमकी देणारा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला असून त्यांनी तो क्रमांक ट्विटरवर शेअर करत संतप्त प्रतिक्रिया दिली.

  3. पूर्वीचा वादही चर्चेत: या दोघांमध्ये याआधीही "मंगळसूत्र चोर" या घोषणेवरून वाद झाला होता, ज्यामुळे दोघांचे समर्थक सोशल मीडियावर एकमेकांवर टीका करत आहेत.

Mumbai News : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं सध्या मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यानच विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहासह बाहेरही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची'कुस्ती' पाहायला मिळत आहे. मात्र, विधिमंडळाच्या आवारातच बुधवारी (ता.16) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर एकमेकांना भिडल्याचं दिसून आलं.

याचवेळी दोन्ही नेत्यांमध्ये शिवीगाळ झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सगळ्याबाबत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी(ता.18) प्रसारमाध्यमांशी आक्रमक भूमिका घेतली होती. याचवेळी आता त्यांनी गुरुवारीच एक धक्कादायक ट्विट केलं आहे.या ट्विटमधून त्यांनी महाराष्ट्रात काय सुरू असल्याचा संतप्त सवालही केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये एक फोन नंबर शेअर केला आहे.या नंबरवरुन त्यांना फोन केला असून व्हाटस् अप मेसेज पाठवला आहे. या मेसेजमध्ये अतिशय आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली असून आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचीही धक्कादायक बाब समोर आली आहे. या मेसेजला भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यासोबतच्या बुधवारी झालेल्या वादावादीचंही संदर्भ असल्याचं प्रथमदर्शनी पाहायला मिळत आहे.

Jitendra Awhad Vs Gopichand Padalkar .jpg
Nagpur Politics: तरुण तुर्कांची होणार जिल्हा परिषदेत एन्ट्री! अनेक नेत्यांचे चिरंजीव लागले कामाला; कोण कोण आहे रांगेत?

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात बुधवारी (ता.16) विधिमंडळ परिसरातच जुंपली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी विधानभवन परिसरात जात असताना "मंगळसूत्र चोराचा...मंगळसूत्र चोराचा..",अशा घोषणा दिल्या होत्या. आव्हाड यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. यातच आता पडळकर आणि आव्हाड यांच्यात एकाच आठवड्यात दुसर्‍यांदा खटके उडाल्याचं दिसून येत आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी पडळकरांसोबत झालेल्या वादावर त्यांची भूमिका स्पष्ट केली.यावर ते म्हणाले, गोपीचंद पडळकर काल म्हणाले की, कोणी माझ्या गाडीसमोर आले तर मी असाच दरवाजा उघडणार. हा सत्तेचा माज आहे. त्याच्या गाडीचा दरवाजा मला नाही संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख याला लागला आणि म्हणून त्यांनी बोलल्याचंही आव्हाडांनी सांगितलं.

Jitendra Awhad Vs Gopichand Padalkar .jpg
BJP Politics : भाजपची रणनिती ठरली ! निवडणुकीआधी मुख्यमंत्री फडणवीस आख्खा महाराष्ट्र पिंजून काढणार

तसेच आव्हाड म्हणाले,त्यानंतर गोपीचंद पडळकर हा विधिमंडळ परिसरात शिव्या द्यायला लागला. तुम्ही जर अशीच गाडी चालणार असाल तर आम्ही आता त्याला काय करणार, बंदुका घेऊन या...जीव घ्या आमचा.मी परवाच्या दिवशी फक्त मंगळसूत्र चोर म्हणून बोललो म्हणून एवढा राग आल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला

मी पडळकर यांना मंगळसूत्र चोर का बोललो? कारण मी कोणावर वैयक्तिक टीका करत नाही. मला त्यादिवशी तो 'अर्बन नक्षल'आणि 'मुसलमानांचा एक्स', असं त्यांनी म्हटलं. मी पंधरा-वीस कार्यकर्त्यांसोबत फिरत नाही, मी एकटा फिरतो. घाला गाडी माझ्यावर, असे आव्हानही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिला.

Jitendra Awhad Vs Gopichand Padalkar .jpg
Kolhapur Politics : कोल्हापूरमध्ये 'सोन्याच्या गावात' प्रचंड राजकीय गोंधळ; सरपंचाविरोतील अविश्वास ठरावावर ग्रामस्थांचं मतदान

याचवरुन गेले काही दिवस शरद पवारांचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर एकमेकांना भिडल्याचंही पाहायला मिळत आहे. पण पडळकर हे सातत्यानं शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबावरही तिखट शाब्दिक हल्ले चढवताना दिसून येतात. याचवरुन पडळकर आणि शरद पवारांच्या नेतेमंडळींमध्ये अनेकदा टोकाचे वादही पेटले आहेत.

  1. प्रश्न: वाद कुठे झाला?
    उत्तर: वाद महाराष्ट्र विधिमंडळाच्या परिसरात झाला.

  2. प्रश्न: आव्हाड यांना धमकी कशी दिली गेली?
    उत्तर: व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली.

  3. प्रश्न: या वादामागचं कारण काय होतं?
    उत्तर: "मंगळसूत्र चोर" घोषणेमुळे आधीच तणाव निर्माण झाला होता.

  4. प्रश्न: दोन्ही आमदारांनी यावर काय प्रतिक्रिया दिली?
    उत्तर: जितेंद्र आव्हाड यांनी सार्वजनिक ट्विट करत आक्रमक भूमिका घेतली; पडळकर यांची भूमिका अजून स्पष्ट नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com