Ajit Pawar Latest News : पहाटेच्या शपथविधीनंतर दुपारचा शपथविधी गाजणार; अजित पवार दुसऱ्यांदा भाजपाबरोबर...

Ncp News : अजित पवार यांच्यासोबत जवळपास ४० आमदार आहेत.
Eknath Shinde - Devendra Fadnavis - Ajit Pawar
Eknath Shinde - Devendra Fadnavis - Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. आज सकाळपासून अजित पवारांच्या देवगीरी बंगल्यावर समर्थक आमदारांची बैठक सुरू होती. या बैठकीनंतर पवार राजभवनावर दाखल झाले आहे. त्यामुळे अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूंकप घडला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्ष संघटनेची जबाबदारी द्या, अशी मागणी केली होती. त्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

Eknath Shinde - Devendra Fadnavis - Ajit Pawar
Maharashtra Politics : शिवसेनेनंतर राष्ट्रवादीही फुटली, अजितदादांसोबत ३५ आमदार : नऊ आमदार मंत्री होणार..

मात्र, यामुळे पुन्हा एकाद पहाटेच्या शपथविधीनंतर दुपारचा शपथविधी गाजणार आहे. पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप-प्रत्योराप झाले होते. पहाचेच्या शपथविधीनंतर ८० तासात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांचे सरकार पडले होते. मात्र, आता दुपारी अजित पवार शपथविधी घेणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे.

अजित पवार यांच्यासोबत जवळपास ४० आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे अनेक नेते शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामध्ये अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफही मंत्री होणार असल्याची चर्चा आहे. राजभवणावर खासदार अमोल कोल्हे आणि ज्येष्ठ नेते सुनील तटकरेही उपस्थित आहेत.

Eknath Shinde - Devendra Fadnavis - Ajit Pawar
Ajit Pawar New DCM : अजितदादांसोबत छगन भुजबळही मंत्रिपदाची शपथ घेणार; पवारांचे निकटवर्तीय पटेल, वळसे पाटीलही राजभवनावर

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फुट पडली आहे. त्यामुळे त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भुकंप झाला आहे. मात्र, आता पाहाटेच्या शपथविधीनंतर आता दुपारचा शपतविधी गाजणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com