Standing Committee Chairman : स्थायी समिती सभापतीपदी हसमुख गेहलोत, महिला-बालकल्याण समितीची निवडणूक बिनविरोध

Mira Bhayandar Hasmukh Gehlot : स्थायी समितीच्या १६ सदस्यांपैकी भाजपकडे १३ तर काँग्रेस व शिवसेना यांच्या शहर विकास आघाडीकडे ३ सदस्य आहेत. त्यामुळे सभापती पदाची निवडणूक एकतर्फी होणार हे निश्चित होते.
Standing Committee Chairman Mira Bhayandar   Hasmukh Gehlot
Standing Committee Chairman Mira Bhayandar Hasmukh Gehlotsarkarnama
Published on
Updated on

प्रकाश लिमये

Mira Bhayandar News : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत अपेक्षेनुसार भाजपचे  हसमुख गेहलोत विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे  अनिल सावंत यांचा १३ विरुद्ध ३ मतांनी पराभव केला. महिला बाल कल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी केवळ भाजपकडूनच उमेदवारी अर्ज आल्याने या पदांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली.

स्थायी समितीच्या १६ सदस्यांपैकी भाजपकडे १३ तर काँग्रेस व शिवसेना यांच्या शहर विकास आघाडीकडे ३ सदस्य आहेत. त्यामुळे सभापती पदाची निवडणूक एकतर्फी होणार हे निश्चित होते. या निवडणुकीसाठी माजी उपमहापौर हसमुख गेहलोत यांनी भाजपकडून व अनिल सावंत यांनी कॉँग्रेसकडून सोमवारी (ता.3) उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते.

स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे वरिष्ठ नगरसेवक  प्रकाश उर्फ मुन्ना सिंह हे देखील इच्छुक होते. मात्र पक्षाकडून गेहलोत यांनाच उमेदवारी देण्यात आली . गेहलोत हे आमदार नरेंद्र मेहता यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे पहिल्या वर्षी सभापती पदासाठी त्यांनाच उमेदवारी मिळेल असा अंदाज वर्तविण्यात येत होता.

Standing Committee Chairman Mira Bhayandar   Hasmukh Gehlot
Rajya Sabha Election : एकनाथ शिंदेंची माघार, दुसरा उमेदवार नाहीच; शरद पवारांच्या उमेदवारीने चित्र पालटले!

दुसरीकडे महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदावर भाजप उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. समितीच्या एकंदर ९ सदस्यांपैकी भाजपकडे ७ व विरोधी पक्षाकडे दोनच सदस्य आहेत. सभापती व उपसभापती पदासाठी दाखल करायच्या उमेदवारी अर्जावर सूचक व अनुमोदक यांच्या सह्या आवश्यक असतात.

परंतु विरोधी पक्षांकडे दोनच सदस्य असल्याने उमेदवाराला अनुमोदन देण्यासाठी त्यांच्याकडे सदस्यच नव्हता. परिणामी काँग्रेस व शिवसेनेकडून या पदांसाठी उमेदवारी अर्जच दाखल करण्यात आले नाही. सभापती पदी भाजपच्या वरिष्ठ नगरसेविका अनिता पाटील व उपसभापती पदी  हेमा बेलानी यांची बिनविरोध निवड झाली.

Standing Committee Chairman Mira Bhayandar   Hasmukh Gehlot
Jyoti Waghmare : एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र, दिग्गजांचा पत्ता कट, ज्योती वाघमारेंना राज्यसभेची लॉटरी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com