Jyoti Waghmare : एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र, दिग्गजांचा पत्ता कट, ज्योती वाघमारेंना राज्यसभेची लॉटरी!

Eknath Shinde Shiv Sena Candidate : शिवसेनेचा आक्रमक चेहरा अशी ज्योती वाघमारेंची ओळख आहे. तर वाघमारे यांना संधी देत शिंदेंनी स्वपक्षीयांसह सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.
Jyoti Waghmare Rajya Sabha | Eknath Shinde Shiv Sena Candidate
Eknath Shinde and Jyoti Waghmare arrive together to file the nomination for the Rajya Sabha election in MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 05 Mar : राज्यसभा निवडणुकीसाठी १६ मार्चला मतदान होणार असून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज गुरूवार (ता.०५) शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या सात जागा आहेत. त्यापैकी जवळपास ६ जागांवरील उमेदवार निश्चित झाले आहेत.

मात्र, महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नव्हता. मात्र, अखेर आता शिंदेंच्या शिवेसनेने देखील आपला उमेदवार जाहीर केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे, याबाबतचं वृत्त साम टीव्हीने दिलं आहे.

शिवसेनेचा आक्रमक चेहरा अशी ज्योती वाघमारेंची ओळख आहे. तर वाघमारे यांना संधी देत शिंदेंनी स्वपक्षीयांसह सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. दरम्यान, राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. याआधी काल रात्री शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि उदय सामंत यांच्यात एक बैठक पार पडली.

Jyoti Waghmare Rajya Sabha | Eknath Shinde Shiv Sena Candidate
Priyanka Chaturvedi : राज्यसभेचे तिकीट नाकारले; आदित्य ठाकरे नाराज? प्रियांका चतुर्वेदींची पोस्ट, म्हणाल्या, जिंकून येणार...

या बैठकीत शिवसेनेकडून दोन उमेदवार देण्याबाबतच चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, शिंदेंनी एकच उमेदवार देत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. नुकतंच विधीमंडळात एकनाथ शिंदे आणि ज्योती वाघमारे यांनी सोबत येत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

दरम्यान, शिवसेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळे, शायना एनसी यांची नावे खूप चर्चेत आहेत. यासह ज्योती वाघमारे, संजय निरुपम, गजानन किर्तीकर, आनंदराव अडसूळ, हेमंत गोडसे आणि संजय मंडलिक हे देखील राज्यसभेसाठी इच्छुक होते. मात्र, आता या सर्वांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

Jyoti Waghmare Rajya Sabha | Eknath Shinde Shiv Sena Candidate
Baramati NCP Politics : बारामती मधील 'या' संस्थेला अजितदादांचे नाव देण्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा विरोध

तर ज्योती वाघमारे या दलित समाजातील आक्रमक चेहरा आहेत. त्यांना उमेदवारी देऊन एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची महिला आघाडी आक्रमक असायची. त्यानुसार आता एकनाथ शिंदे यांनी देखील शिवसेनेच्या महिला आघाडीला संधी देत सत्तेत वाटा दिल्याचं बोललं जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर एकनाथ शिंदे यांनी ग्राऊंड झिरोवर काम करणाऱ्या महिलांना संधी दिल्याचा संदेश एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं वाघमारे यांच्या उमेदवारीतून दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com