मुंबई : आयएनएस विक्रांत कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने भाजप (BJP) नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना अटकपूर्व जामीन दिला आहे. यामुळे काही दिवसांसाठी नॉट रिचेबल असलेले किरीट सोमय्या जामीन मिळताच मुंबईत अवतरले होते. यानंतर आता त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांनाही उच्च न्यायालयाने दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. (Neil Somaiya Latest News)
या प्रकरणी माजी सैनिक बबन भोसले यांनी सोमय्या यांच्याविरोधात तक्रार केली आहे. फसवणूक आणि विश्वासघात कलमांन्वये तुर्भे पोलीस ठाण्यात सोमय्या पिता-पुत्रांविरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्या प्रकरणी अटक होण्याच्या शक्यतेने सोमय्या आणि त्यांचे पुत्र नगरसेवक नील सोमय्या यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. न्यायालयाने सोमय्या पिता-पुत्रांना दणका देत त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. नंतर सोमय्या यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. आता त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनाही उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
विक्रांत युद्धनौका संवर्धनासाठी सोमय्या यांनी काही वर्षांपूर्वी निधी संकलन अभियान राबवले होते. त्यामध्ये नागरिकांकडून निधी घेण्यात आला होता. त्यात जमा झालेली सुमारे 58 कोटींची रक्कम अद्याप सरकारकडे जमा केली गेली नाही, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा झालेले 58 कोटी रुपये सोमय्यांनी हडप केल्याचा आरोप राऊत यांनी राज्यपाल कार्यालयातील पत्राचा हवाला देत केला होता. त्यानंतर माजी सैनिक भोसले यांनी सोमय्या यांच्याविरोधात तक्रार दिली होती.
शिवसेनेचे (shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आयएनएस विक्रांत बचावासाठी जमा केलेल्या पैशात सोमय्या यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सोमय्या यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्या विरोधात सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनसाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने सोमय्यांना जामीन अर्ज फेटाळून लावला होता. तेव्हापासून सोमय्या नॉट रिचेबल होते. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.