झेड सिक्युरिटी असलेले सोमय्या कुठयेत? वळसे पाटील केंद्राला आणणार अडचणीत

आयएनएस विक्रांत युद्धनौका निधी गैरव्यवहारामध्ये गुन्हा दाखल झालेले भाजपचे नेते किरीट सोमय्या सध्या नॉट रिचेबल आहेत.
Kirit Somaiya-Dilip walse Patil News, Kirit Somaiya News
Kirit Somaiya-Dilip walse Patil News, Kirit Somaiya News Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : आयएनएस विक्रांत युद्धनौका निधी गैरव्यवहारामध्ये गुन्हा दाखल झालेले भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) सध्या नॉट रिचेबल आहेत. सत्र न्यायालयानेही सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. राज्याच्या गृह विभागालाही सोमय्या नेमके कुठे आहेत, याची माहिती नाही. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आता मोठं पाऊल उचलणार आहे. (Kirit Somaiya News Updates)

मंगळवारी सकाळी माध्यमांशी बोलताना वळसे पाटील यांना सोमय्यांबाबत विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, झेड सुरक्षा असलेले किरीट सोमय्या कुठे आहेत, हे आता केंद्र सरकारलाच विचारू, असं वळसे पाटील म्हणाले आहेत. सोमय्या यांना केंद्र सरकारने मागील वर्षी झेड सिक्युरिटी दिली आहे. त्यामुळे सोमय्या हे सतत सुरक्षारक्षकांच्या गराड्यात असतात. त्यामुळे सोमय्यांचा नेमका पत्ता विचारून वळसे पाटील केंद्रालाच अडचणीत टाकणार आहेत.

Kirit Somaiya-Dilip walse Patil News, Kirit Somaiya News
धक्कादायक : ओवेसींच्या हत्या करून दोघांना बनायचा होतं हिंदुत्ववादी नेता!

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या हल्या प्रकरणाची माहिती असूनही सुरक्षा का वाढवली नाही, याबाबत समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबत चौकशी सुरू आहे, असं वळसे पाटील यांनी सांगितले. सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी ठेवणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचे संकतेही त्यांनी यावेळी दिले. या प्रकरणातील पाच आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सोमय्या का आलेत अडचणीत?

माजी सैनिक बबन भोसले यांनी सोमय्या यांच्याविरोधात तक्रार केली आहे. फसवणूक आणि विश्वासघात कलमांन्वये तुर्भे पोलीस ठाण्यात सोमय्या पिता-पुत्रांविरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. त्या प्रकरणी अटक होण्याच्या शक्यतेने सोमय्या आणि त्यांचे पुत्र नगरसेवक नील सोमय्या (Neil Somaiya) यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. न्यायालयाने सोमय्यांना दणका देत त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. नील सोमय्या यांच्या जामीन अर्जावर न्यायालय मंगळवारी निर्णय सुनावणार आहे. तर किरीट सोमय्या उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज करणार आहेत.

Kirit Somaiya-Dilip walse Patil News, Kirit Somaiya News
राऊतांनी सोमय्यांना पुन्हा डिवचले, 140 कोटी जमा करणार होते, पण 58 कोटीच जमवले

विक्रांत युद्धनौका संवर्धनासाठी सोमय्या यांनी काही वर्षांपूर्वी निधी संकलन अभियान राबवले होते. त्यामध्ये नागरिकांकडून निधी घेण्यात आला होता. त्यात जमा झालेली सुमारे 58 कोटींची रक्कम अद्याप सरकारकडे जमा केली गेली नाही, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा झालेले 58 कोटी रुपये सोमय्यांनी हडप केल्याचा आरोप राऊत यांनी राज्यपाल कार्यालयातील पत्राचा हवाला देत केला होता. त्यानंतर माजी सैनिक भोसले यांनी सोमय्या यांच्याविरोधात तक्रार दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com