सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक झाली हे खरंय! गृहमंत्री वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

मुख्यमंत्री ठाकरेंनी 70 ते 80 गुंड पाठवून हल्ला केल्याचा सोमय्यांचा दावा
Dilip Walse Patil
Dilip Walse Patil Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ‘मातोश्री’समोर हनुमान चालिसा पठणाचा राणा दांपत्यानं इशारा दिला होता. खार पोलिसांनी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना अटक केली आहे. त्यांना भेटायला गेलेले भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर हल्ला झाला असून, तो शिवसैनिकांनी केल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सोमय्यांच्या गाडीवर दगडेफक करण्यात आल्याला गृहमंत्री वळसे पाटलांनी दुजोरा दिला आहे. याबाबत सगळ्यांनी समजुतीनं घ्यावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. ते म्हणाले की, दुर्दैवाने ही घटना घडली आहे. आता त्यात सगळ्यांनीच समजुतीनं सहकार्य करणं गरजेचं आहे. दगडफेक झाली हे खरं असलं तरी ती कुणाकडून झाली, का झाली, याचा तपास करावा लागेल. हा तपास करून पोलीस योग्य कारवाई करतील. पोलिसांना वेगळे आदेश देण्याची गरज नसून, पोलिसांना त्यांचं काम माहिती आहे. त्याप्रमाणे त्यांनी कर्तव्य पार पाडलं पाहिजे.

Dilip Walse Patil
सोमय्यांवर हल्ला नव्हे तर त्यांनीच शिवसैनिकांवर गाडी घातली! पोलिसांकडे तक्रार दाखल

राणा दांपत्याला अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. राणा दांपत्याला खार पोलीस ठाण्यात भेटायला गेलेल्या सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. विशेष म्हणजे, सोमय्यांना झेड प्लस सुरक्षा असतानाही हा हल्ला झाला आहे. सोमय्या हे यात जखमी झाले आहेत. सोमय्यांनी या प्रकरणी शिवसैनिकांकडे बोट दाखवलं आहे. तर सोमय्यांनी अंगावर गाडी घातल्याचा दावा शिवसैनिकांनी केला आहे. याबाबत सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री ठाकरेंनी 70 ते 80 गुंड पाठवून हल्ला केला आहे. मी जखमी असून, माझ्या कारमध्ये बसून आहे. माफिया सेनेच्या गुंडावर पोलीस कारवाई करीत नाहीत, तोपर्यंत मी वांद्रे पोलीस ठाण्यासमोर कारमध्येच बसून राहणार आहे.

Dilip Walse Patil
नवा ट्विस्ट! अटक होताच राणा दांपत्यानं मुख्यमंत्री ठाकरेंसह राऊत, परबांना आणलं अडचणीत

काल (ता.23) खार येथील राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. बाहेर शिवसैनिक हे राणा दांपत्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांची माफी मागावी, अशी मागणी करत होते. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून तणावाचे वातावरण बनत चालेले होते. अखेर पोलिसांनी सुरक्षितपणे त्यांना घराबाहेर काढून त्यांना खार पोलीस ठाण्यात नेले. नंतर त्यांना अटक करण्यात आली. राणा दांपत्यावर दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केल्याप्रकरणी कलम १५३ अ लावण्यात आलं आहे. हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. यामुळं राणा दांत्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांच्याबाबत निर्णय होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com