सरकारला आणखी किती एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या हव्यात..?

प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर व्टिटरच्या माध्यमातून टीकेची झोड उठवली आहे
Pravin Darekar, Udhav Thackeray
Pravin Darekar, Udhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढलेल्या आत्महत्यांवरून विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी व्टिटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाब विचारला आहे. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांना कुणी वाली आले का. सरकार नावाची संस्था राज्यात जिवंत आहे का, सरकारला आणखी किती एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या हव्या आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत व पुरेसा पगार मिळत नाहीत. यातूनच आर्थिक विवंचनेत असलेले काही कर्मचारी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. एसटीचे सर्वच कर्मचारी आर्थिक विवंचनेत आहेत. त्यांना पगारच निट मिळत नाही. याकडे राज्य सरकारचे मात्र, दुर्लक्ष झालेले आहे. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर व्टिटरच्या माध्यमातून टीकेची झोड उठवली आहे.

Pravin Darekar, Udhav Thackeray
अभिजित बिचुकले म्हणतात.. मला फक्त एक दिवस मुख्यमंत्री करा...

प्रवीण दरेकर यांनी दोन प्रकारची व्टिट केली आहेत. एका व्टिटमध्ये ते म्हणतात की, एसटी कर्मचाऱ्यांना कुणी वाली उरलाय का. या राज्यात "सरकार" नावाची संस्था "जिवंत"आहे का. एकामागून एक एसटी कर्मचाऱ्यांचा बळी जात असून त्यांचे कुटुंब रस्त्यावर येत आहेत. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीला अहवाल द्यायला वेळ नाही. तर दुसऱ्या व्टिटमध्ये श्री. देरकर यांनी म्हटले की, सरकारला आणखी किती कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या हव्यात. मुख्यमंत्र्यांनी एखादे सांत्वनपर पत्र त्या असहाय झालेल्या कुटुंबियांनाही लिहाल का? एसटी कर्मचाऱ्यांना मदतीचा हात कधी देणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com