हनुमान चालिसाला विरोध करणारे बाळासाहेबांचे सैनिक नाहीत; उद्या मातोश्रीवर जाणारच!

Ravi Rana | Navneet Rana : उद्या सकाळी ९ वाजता उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठणं करणार
Ravi Rana-Navneet Rana
Ravi Rana-Navneet RanaSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्रात जी काही संकट चालू आहेत, त्यातून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी आम्ही उद्या (२३ एप्रिल) रोजी मातोश्रीबाहेर जाणार आहोत. सकाळी ९ वाजता आम्ही तिथे जावून हनुमान चालिसा पठण करणारच आहे, अशी ठाम भूमिका बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana यांनी स्पष्ट केली आहे. आज राणा दाम्पत्य मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना रवि राणा म्हणाले, आम्ही हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी विनंती करुन परवानगी मागितली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भात येत नाहीत. शेतकऱ्याच्या बांधावर जात नाहीत. दोन वर्ष मंत्रालयात जात नाहीत. विकास थांबला आहे. बेरोजगारी वाढली आहे. औद्योगिक विकास थांबला आहे, यासाठी तिथे हनुमान चालिसा वाचणं गरजेचे आहे.

पण हनुमान जयंतीदिवशी आम्हाला विरोध करण्यात आला. ज्यांनी आम्हाला विरोध केला ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे शिवसैनिक नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आमच्या ह्रदयात आहेत. मातोश्री हिंदुसाठी मंदिर आहे, पण आता याच ठिकाणी जर हनुमान चालिसा वाचण्यास विरोध होत असल्यास उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरले आहेत. हिंदुत्वाची दिशा सोडून ते दुसरीकडेच कुठेतरी जात आहेत आणि महाराष्ट्राच वाटोळे करत आहात. म्हणून हे आलेले विघ्न संपवण्यासाठीच उद्या आम्ही मातोश्रीवर जाणारच आहे असे, रवि राणा यांनी स्पष्ट केले.

दरम्यान मातोश्री (Matoshri) निवासस्थानाबाहेर २३ एप्रिल रोजी हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्धारने खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवि राणा हे दाम्पत्य आज सकाळी मुंबईमध्ये दाखल झाले आहे. यापूर्वी ते आज (ता. २२ एप्रिल) विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईला जाणार होते. पण पोलिस आणि शिवसैनिकांच्या हातावर तुरी देवून दोघेही मुंबईत दाखल झाले आहेत. (Navneet Rana And Ravi Rana Reached at mumbai)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com