BMC Election : कबुतरांनी बदलली गणितं; BMC निवडणुकीसाठी जैन मुनींकडून नव्या पक्षाची घोषणा, कोणाला फटका बसणार?

BMC Election : जैन समाजाने शांतिदूत जनकल्याण पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली असून, कबूतर हे चिन्ह घेऊन हा पक्ष मुंबई महापालिका निवडणुकीत उतरला आहे. या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Jain guru Nileshchandra Vijay announces new political outfit ‘Shantidoot Jan Kalyan Party’ with ‘Pigeon’ as its symbol ahead of Mumbai civic polls 2025.
Jain guru Nileshchandra Vijay announces new political outfit ‘Shantidoot Jan Kalyan Party’ with ‘Pigeon’ as its symbol ahead of Mumbai civic polls 2025.Sarkarnama
Published on
Updated on

BMC Election : आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईच्या राजकीय वर्तुळात आणखी एका पक्षाची एन्ट्री झाली आहे. जैन समाजाने त्यांच्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. शांतीदूत जणकल्याण पक्ष असे या पक्षाचे नाव असून कबुतर हे चिन्ह घेणार असल्याचे जैन धर्मगुरु निलेशचंद्र विजय यांनी सांगितले.

मुंबईतील कबुतरखाने बंद केल्याने मागील काही दिवसांपासून खाद्य न मिळाल्याने कबुतरांचा भुकेने मृत्यू होत आहे. रस्त्या-रस्त्यांवर मृत कबुतकांचा खच पडलेला दिसत आहे. या मृत कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी धर्मसभा आयोजित करण्यात आली होती. यात निलेशचंद्र विजय यांनी ही घोषणा केली.

निलेशचंद्र विजय म्हणाले, जैन समाज हा शांतीप्रिय समाज आहे. सर्वात जास्त टॅक्स भरणारा, सर्वात जास्त हॉस्पिटल उभारणारा, सर्वात जास्त उद्योग उभे करणारा जैन, मारवाडी आणि गुजराती समाज आहे. आता मराठवाड्यात महापूर आला, त्यातही समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 2 कोटी रुपयांचा चेक दिला होता.

Jain guru Nileshchandra Vijay announces new political outfit ‘Shantidoot Jan Kalyan Party’ with ‘Pigeon’ as its symbol ahead of Mumbai civic polls 2025.
Eknath Shinde : मिशन 'BMC': एकनाथ शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना 'कानमंत्र'; 'मेहनत करा, महापौर आपलाच!'

आता आम्हाला आमचाही पक्ष असावा असे वाटत आहे. ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांनी माता जगदंबेचा आशीर्वाद घेऊन वाघाचे चिन्ह घेऊन शिवसेनेची स्थापना केली, त्याचप्रमाणे शांतीदूत कबुतराचे चिन्ह घेऊन आम्ही शांतीदूत जनकल्याण पक्षाची स्थापना करत आहोत. हे फक्त जैन समाजाचा पक्ष नसेल. यात राजस्थान, मारवाडी, गुजराती असतील ते सर्व एक होऊ. आम्ही महापालिकेसाठी आमचे वाघ उभे करू, अशी घोषणा त्यांनी केली.

Jain guru Nileshchandra Vijay announces new political outfit ‘Shantidoot Jan Kalyan Party’ with ‘Pigeon’ as its symbol ahead of Mumbai civic polls 2025.
Mumbai BMC funds 2000 crore loss : मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवीत झपाट्याने घट; आठ महिन्यांत मोठी घसरण, काय कारण?

कोणाला युतीला फटका बसणार?

नव्या शांतीदूत जनकल्याण पक्षाने त्यांचे उमेदवार उभे केल्यास याचा फटका कोणाला बसणार? असा सवाल विचारला जात आहे. मुंबईत जैन, राजस्थानी, मारवाडी, गुजराती समाजाचे मतदान मोठ्या संख्येने आहे. कबुतरखाने बंद केल्याने हा समाज दुखावला होता. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अगदी 100 मतांवरही निवडणुकीचा निकाल बदलत असतो. आता ही मते कोणाच्या निकालावर परिणाम करणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com