Jitendra Avhad Dahi Handi : ठाण्यातील मनसेच्या दहीहंडीला जितेंद्र आव्हाडांची हजेरी; त्यांच्या 'या' कृतीची जोरदार चर्चा

Thane MNS Dahi Handi News : यंदा 'मराठी सणांसाठी, मराठी मनांसाठी' असे ब्रीदवाक्य घेऊन या दहीहंडीचे आयोजन केले आहे. या मनसेच्या दहीहंडीत माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हजेरी लावली. त्यासोबतच यावेळी आव्हाड यांनी केलेल्या एका कृतीची जोरदार चर्चा रंगली आहे.
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

Thane News : आगामी काळात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. त्याची जोरदार तयारी सर्वच पक्ष करीत आहेत. त्यातच आता दहीहंडीच्या निमित्ताने मुंबई, ठाणे व पुण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे. त्यामुळे या उत्सवाचा सर्वच पक्ष राजकीयदृष्ट्या फायदा करून घेताना दिसत आहेत. ठाण्यात एकीकडे मनसेचे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मनसे दहीहंडीचा उत्सव उत्साहात सुरू आहे. यंदा 'मराठी सणांसाठी, मराठी मनांसाठी' असे ब्रीदवाक्य घेऊन या दहीहंडीचे आयोजन केले आहे. या मनसेच्या दहीहंडीत माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हजेरी लावली. त्यासोबतच यावेळी आव्हाड यांनी केलेल्या एका कृतीची जोरदार चर्चा रंगली आहे.

Jitendra Awhad
Uddhav-Raj Thackeray news : संजय राऊतांनी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधला! ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा : कुठे कुठे एकत्र लढणार?

मनसेचे नेत अविनाश जाधव यांनी ठाण्यामध्ये आयोजित केलेल्या दहीहंडीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awahad) यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना मराठी माणसाची ताकद दाखवा असे म्हणत 'जय जय महाराष्ट्र' गीत गायले. त्यामुळे या त्यांच्या कृतीची जोरदार चर्चा रंगली होती.

Jitendra Awhad
BJP News: वाहतूक पोलिसांचा सीएम फडणवीसांच्या जवळच्या आमदाराला मोठा दणका; नेमकं काय घडलं?

ठाण्यात मनसे (MNS) दहीहंडीच्या निमित्ताने 'मराठी सणांसाठी, मराठी मनांसाठी' असे ब्रीदवाक्य घेऊन या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्व ठिकाणी 'म... मराठीचा' असे बॅनर लावले आहेत. यावेळी जितेंद्र आव्हाड हे स्टेजवर आल्यानंतर मनसेच्या अविनाश पानसे यांनी त्यांचे आभार मानले.

Jitendra Awhad
Devendra Fadnavis On Thackeray: मुख्यमंत्र्यांनी दहीहंडीच्या दिवशीच ठाकरेंना ललकारलं; म्हणाले,'महापालिकेतील पापाची हंडी...'

यावेळी त्यांनी आव्हाडांचे कौतुक करताना दहीहंडी सण जगभरात पोहोचवला. स्पेनची टीम मुंबईत आणली अशा शब्दात पानसे यांनी आव्हाडांचे कौतुक केले. जितेंद्र आव्हाडांच्या हातात माईक येतात त्यांनी डीजेला जय जय महाराष्ट्र हे राज्यगीत लावण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना महाराष्ट्र गीतावर हात वरती करण्याचं आवाहन केल्याने सगळ्यांनी हात वरती पाहिजेत. हे आपल्या महाराष्ट्राचं गीत आहे, मराठी माणसाचे गीत आहे. एकही हात खाली असता कामा नये, मराठी माणसाची ताकद दाखवा असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले.

Jitendra Awhad
NCP Politics : सुरज चव्हाणांच्या नियुक्तीमुळे अजितदादांचं टेन्शन वाढणार, तटकरेंच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीतील एक गट नाराज

त्याचवेळी आव्हाडांनी स्वतः महाराष्ट्र गीत गायलं. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय! अशा घोषणाही जितेंद्र आव्हाडांनी केली. यानंतर माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "जुने दिवस आठवले, पक्ष जात धर्म विसरून येथे गोविंदा पथक येत असतात. आम्ही त्यांच्यासाठी इथे येत असतो. आज अविनाशने बोलावलं, मी आलो. इथे आल्यावर राज्यगीत, जे मी माझा कार्यक्रमात घ्यायचो ते घेतलं. आज थोडं फ्लॅशबॅक गेलो."

Jitendra Awhad
Ajit Pawar : "कुणी कुठे लाइन मारायला गेला तर टायरखाली..." मुलींची छेड काढणाऱ्यांवर अजितदादा संतापले

आव्हाड याच्या गोविंदात कायम पायरीवर उभे राहून गोविंदाचा कार्यक्रम बघायचो. या कार्यक्रमाला ग्लोबल स्वरूप कोणी दिलं तर आव्हाड साहेबांनी. ठाणे ही दहिहंडी उत्सवाची पंढरी आहे आणि या पंढरीचा विठ्ठल हा जितेंद्र आव्हाड आहे अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली.

Jitendra Awhad
Bachchu Kadu vs BJP minister : फिल्मी स्टाईल जंप : आंदोलनकर्त्याला लाथाडणाऱ्या 'DYSP'चं आता काही खरं नाही!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com