Jitendra Awhad On Mitkari : आव्हाडांनी मिटकरींना डिवचले; म्हणाले, अजून तो रांगणारा बालकच...

Rahul Gandhi राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ही राजकीय नाही. त्यांच्या पक्षाला मोठे करायचे त्यांनी ठरवले नाही. देशात जे काय सुरू आहे, त्याच्या विरोधात ही यात्रा आहे.
Jitendra Awhad, Amol Mitkari
Jitendra Awhad, Amol Mitkarisarkarnama
Published on
Updated on

Mumbai NCP News : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज अमोल मिटकरी यांना डिवचले. पाच हजारांत ज्ञान विकणारा हा माणूस आहे. कारण त्याचे पाठांतर चांगले असल्यामुळे तो अजितदादांना आवडला. त्याचं राजकीय वय तीन वर्षेदेखील नाही. अजून तो रांगणारा बालक आहे, अशी टीका आव्हाडांनी केली.

अमोल मिटकरी यांच्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी राजकीय काम बघून स्टेटमेंट देत असतो. याचं वय राजकीय तीन वर्षेदेखील नाही. अजून तो रांगणारा बालक आहे. पाच हजारांत स्वतःचा ज्ञान विकणारा माणूस आहे. तो अजितदादांना आवडला कारण तो चांगलं पाठांतर करतो. त्याला कुठे काय बोलायचं त्याला मार्गदर्शन करू नका. त्याला जे बोलायचं ते पक्षाची भूमिका असते. माझं राजकीय वय शरद पवारांनी सांगितले आहे, अशा माणसाला कुठे उत्तर देत बसायचं, असे सांगत त्यांनी अधिक बोलणं टाळलं.

ईव्हीएमचा हट्ट का...

निवडणूक आयोगावर बोलताना आव्हाड म्हणाले, आगामी लोकसभेची निवडणूक पारदर्शक व्हावी. ईव्हीएममध्ये घोटाळा होऊ नये, एवढीच आमची मागणी आहे. ईव्हीएमच्या माध्यमातून भारतातील लोकशाहीचा अंत होत आहे. अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड ,जर्मन या देशांनी ईव्हीएम बाहेर फेकले आहे, तर भारतात त्यांचा वापर करण्याचा हट्ट का धरला जातो, हा माझा प्रश्न आहे. अमेरिकेसारखी आपण एवढी काय प्रगती केली की आपण ईव्हीएमला चिटकून जात आहोत. हे ईव्हीएम कुठे बनले हे तर शासनच सुरतमध्ये बनल्याचे बोलत आहे.

Jitendra Awhad, Amol Mitkari
Jitendra Awhad : बोरीवली - ठाणे रस्ता म्हणजे पैसे खाण्याचे कुरण; आव्हाडांचा सरकारवर गंभीर आरोप

राहुल गांधींची यात्रा देश वाचविण्यासाठी

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ही राजकीय नाही. त्यांच्या पक्षाला मोठे करायचे त्यांनी ठरवले नाही. देशात जे काय सुरू आहे, त्याच्या विरोधात ही यात्रा आहे. स्वतंत्र भारताचा इलेक्ट्रिक बाँड हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. त्यामुळे देश वाचविण्यासाठी ही यात्रा आहे.

आम्हाला तुम्ही हवे आहात...

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर भाष्य करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, आमच्यात ताळमेळ झालेला आहे. आता कोणतेही मतभेद नाहीत. प्रकाश आंबेडकरांना हात जोडून विनंती आहे, तुमची आमची शक्ती आणि विचारधारा एकच आहे. तुम्ही ज्या शक्तींशी लढत आहात त्याच शक्तीशी आम्ही लढत आहोत. तुम्हाला कुठल्या जागा पाहिजेत, त्या भूमिकेचे आम्ही आहोत. आम्हाला तुम्ही हवे आहात, असेही त्यांनी नमूद केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jitendra Awhad, Amol Mitkari
Jitendra Awhad on Ajit Pawar : जितेंद्र आव्हाडांचा अजितदादांना टोला; दादा मोकळ्या स्वभावाचा; मोकातील आरोपीही सोडला...

ते तर नवरा बायकोचे भांडण...

ठाणे लोकसभा मतदारसंघातील वादावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, तुझ्या घरात भांडण झालं तर बाजूच्याने कशाला पडावं. तुझ्या घरातील भांडणं तूच मिटव. नवरा बायकोचे भांडण झालं तर मिटवा भांडण. उगाच कोणी मध्ये पडू नये. आमची प्रार्थना आहे नवरा बायकोचे भांडण मिटून द्या, आम्ही कधीच वाईट बघत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

Edited By : Umesh Bambare

R

Jitendra Awhad, Amol Mitkari
Thane News : शिवतारेंच्या टीकेवरून परांजपे भडकले; म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी वाचाळवीर शिवतारेला समजवावे, अन्यथा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com