

Mumbai Politics : भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचं त्यांचंच ( उपमुख्यमंत्री अजित पवार) स्वप्न होतं. पण आमदारांना भाजपत किंवा एनडीएमध्ये सामील व्हा, असं आम्ही कुठेही म्हटलेलं नाही. त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नाहीत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रांपासून अनेक विषयांवर सविस्तर भाष्य केलं.
तसेच पंजाब, केरळ, दिल्ली, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्रासह जिथे-जिथे आमचा पक्ष आहे तिथे सर्व ठिकाणी शरद पवार यांनाच अध्यक्ष करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शरद पवार यांचं नाव घोषित करण्यात आलं होतं. नागालँडमधील आमदारांनी भाजपमध्ये सहभागी होण्याबाबत सांगितलं नव्हतं. तिथल्या एका पक्षासोबत आम्ही युती केली होती. त्यांच्या आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. तिथले आमदारही आता वकिलांचा सल्ला घेत आहेत. त्यांच्याकडे ऑर्गनायझेशन नाही. त्यांनी इलेक्शन घेतले नाही, असा आरोप केला. पण हे खोटं आहे. आम्ही रितसर निवडणूक घेऊनच अध्यक्ष पदासाठी कागदपत्रेही सादर केली असल्याचंही जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केलं.
आव्हाड म्हणाले, 'आमदारांनी पक्षातून फारकत घेतली, तेव्हाच आम्ही प्रत्येक आमदारावर अपात्रतेची कारवाई केली होती. तीन तारखेला झालेल्या पत्रकार परिषदेतही आम्ही सर्वांनी 'शरद पवार' हेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, असं मान्य केलं होतं. 30 जूनला अजित पवार गटाने बैठक घेऊन 'अजित पवार' यांना अध्यक्ष केल्याचं जाहीर केलं होतं. त्यांनी सांगितलं की त्यांनी फोनवरून या बैठका घेतल्या, परंतु पक्षाच्या बैठका अशा फोनवरून होत नाहीत.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.