Praful Patel News : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या याचिकेवर एकत्र सुनावणी ? प्रफुल्ल पटेलांचा मोठा दावा

Supreme Court Hearing On Shiv Sena & NCP MLA Disqualification : " आमचे वकील मुकुल रोहतगी तिथे उपस्थित होते. मात्र..."
Praful Patel
Praful PatelSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना फटकारले. न्यायालयाने नार्वेकर हे आमचे आदेश पाळत नाहीत, असा ठपका ठेवत आमदार अपात्रतेच्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी मंगळवारपर्यंत वेळापत्रक जाहीर करा, अन्यथा आम्ही आदेश देऊ, असेही न्यायालयाने सांगितले. आता या सुनावणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मोठं विधान केलं आहे.

अजित पवार गटाचे खासदार आणि नेते प्रफुल्ल पटेल(Praful Patel) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर भाष्य केले. ते म्हणाले, सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादीची याचिका 16 तर शिवसेनेची याचिका 19 क्रमांकाची आहे. आमचे वकील मुकुल रोहतगी तिथे उपस्थित होते. मात्र, न्यायालयात आमच्या याचिकेवर आज सुनावणीच घेतली गेली नाही. येत्या मंगळवारी आमच्या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे, असं विधान पटेल यांनी केले आहे.

Praful Patel
Dharashiv Political News : निधी मिळत नाही म्हणून गळा काढला, तेच अजित पवार बोकांडी; आता कसं वाटतंय...

पटेल नेमकं काय म्हणाले...?

सर्वोच्च न्यायालयात फक्त शिवसेना प्रकरणावरच युक्तिवाद करण्यात आला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणात अनेक गोष्टी वेगळ्या आहेत. शिवसेना प्रकरणातील फॅक्ट्स आणि सर्कमस्टन्सेस वेगळे आहेत. त्यामुळे दोन्ही प्रकरणाला सारखं समजणं योग्य ठरणार नाही. मात्र, दोन्ही प्रकरणांची सुनावणी एकत्रितपणे झाल्याचे काहीजण बाहेर येऊन बोलत आहेत, पण तसं अजिबात झालेलं नाही, अशी स्पष्ट भूमिका पटेल यांनी मांडली आहे.

पटेल म्हणाले, आमच्या प्रकरणावर मंगळवारी सुनावणी होईल. ज्या प्रकरणावर सुनावणी झाली. त्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही. कारण ते प्रकरण दुसऱ्या पक्षाचं आहे, कुणी कोर्टात गेले तरी आम्हाला अजून नोटीस दिलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

पोरखेळ का करताय ?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रता प्रकरणात वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप ठाकरे आणि पवार गटाचा आहे. यावरूनच या दोन्ही गटांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने एकप्रकारे शिक्कामोर्तबच केलं.

राहुल नार्वेकरांनी नवं वेळापत्रक करावं, पोरखेळपणा करू नये. विधानसभा अध्यक्षांना कोणीतरी सांगावं की, हे प्रकरण त्यांनी गांभीर्यानं घेण्याची गरज आहे, पोरखेळ का करताय ?असं म्हणत सरन्यायाधीशांनी अत्यंत कडक शब्दांत नार्वेकरांना झापलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Praful Patel
Shiv Sena MLA Disqualification : राहुल नार्वेकरांचं 'वेळापत्रक' केराच्या टोपलीत; सरन्यायाधीशांचे कडक शब्दांत ताशेरे!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories