Shrikant Shinde Politics : श्रीकांत शिंदे 'बाजीगर', तर राजू पाटील 'रियल धुरंधर'; महापौर पदावरून भाजपला डिवचले

Kalyan-Dombivli Mayor Shrikant Shinde : आपल्याच महापौर होणार अशी हवा भाजपने निवडणुकीच्या आधी तयार केली होती. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर मनसे आणि शिवसेना एकत्र आल्याने सगळीच गणितं श्रीकांत शिंदेंनी बदलल्याची चर्चा आहे.
Raju Patil, Shrikant Shinde
Raju Patil, Shrikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

Shrikant Shinde News : कल्याण-डोंबिवली महापालिकेत एकनाथ शिंदेंची शिवसेना –भाजप युतीचे कितीही गोडवे गायले जात असले, तरी प्रत्यक्ष राजकारणात भाजपला डिवचण्याची आणि कोंडीत पकडण्याची एकही संधी शिंदेंच्या शिवसेनेकडून सोडली जात नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या मतमोजणीनंतर भाजपशी थेट बोलणी न करता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने आपल्या पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी मनसेसोबत थेट तह घडवून आणत सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ मिळवले.

यावरूनच राजकीय उपमांची देवाणघेवाण सुरू झाली आहे. मनसेसाठी राजू पाटील ‘रिअल धुरंधर’ ठरत असताना शिंदेंच्या शिवसेनेच्या दृष्टीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ‘बाजीगर’ ठरल्याची भावना समर्थकांमधून व्यक्त होत आहे.”खासदार शिंदे यांचे तसे फलक शहरभर लावण्यात आले आहेत. यातून भाजपला डिवचण्यात येत आहे.

मनसेचे नेते राजू पाटील यांच्या पाच नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा मिळवत शिवसेनेने महापालिकेतील सत्तेचा मार्ग सुकर केला. या घडामोडींमुळे मनसेकडून पाटील यांना ‘रिअल धुरंधर’ अशी उपाधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, शिंदेची शिवसेनेचा महापौर बसविण्यात निर्णायक भूमिका बजावल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना त्यांच्या समर्थकांकडून ‘बाजीगर’ अशी उपाधी देण्यात येत असून, त्याचे फलक शहरभर झळकत आहेत.

Raju Patil, Shrikant Shinde
Lawyers Boycott Court Work : कोर्ट आहे की बाजार? न्यायाधीशांच्या वर्तनावर वकिलांचा संताप, आंदोलनाची ठिणगी पेटली

गेल्या वर्षभरापासून महापालिकेत भाजपचाच महापौर बसेल, असा दावा भाजपकडून केला जात होता. कल्याण-डोंबिवली भाजपमय करण्याचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे प्रयत्न अंतिम टप्प्यात असतानाच ऐनवेळी राजकीय डावपेचांनी त्यात खीळ घातली गेल्याची चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाने परस्पर उद्धव ठाकरे गटाला कोंडीत पकडत सत्ता मजबूत करत असताना भाजपने सध्या नरमाईची भूमिका घ्यावी, असा सल्ला दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आल्याने प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी संयम बाळगल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

या परिस्थितीचा फायदा घेत खासदार डॉ. शिंदे यांनी मनसेच्या पाच नगरसेवकांबरोबरच ठाकरे गटातील चार नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे शिवसेनेचे संख्याबळ थेट बहुमतापर्यंत पोहोचले. ठाकरे गटातील उर्वरित सात नगरसेवक फोडण्याचे प्रयत्नही झाले; मात्र कर्जत येथील फॉरेस्ट क्लब प्रकरणातून वेळीच माघार घेतल्याने हे नगरसेवक बचावल्याचे सांगितले जाते.

भाजपला ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत

भाजपकडून कोणतीही उघड नाराजी व्यक्त होऊ नये, याची खबरदारी घेत अत्यंत चतुराईने मनसे आणि ठाकरे गटातील नगरसेवकांचा पाठिंबा मिळवून शिवसेना शिंदे गटाने महापालिकेतील सत्ता सुरक्षित केली. या सर्व घडामोडींमुळे कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात भाजपला ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत जावे लागले.

Raju Patil, Shrikant Shinde
Nashik Mayor 2026: महापौरपदासाठी आमदारांची लॉबिंग; गिरीश महाजनांनी बोलावली नगरसेवकांची तातडीची बैठक!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com