Abhijit Bichukale News : उमेदवारी अर्ज भरताना हवा करणारे अभिजित बिचुकले प्रचारातून गायब

kalyan Lok Sabha : अभिजित बिचुकले सातारा लोकसभेच्या निवडणुकीनंतर कल्याणमध्ये प्रचारात सक्रिय होतील, अशी शक्यता होती.
Abhijit Bichukale
Abhijit Bichukalesarkarnama

Lok Sabha 2024 : कल्याण लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर आणि शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे. मात्र, या मतदारसंघातून मोठा गाजावाजा करत बिग बाॅस फेम अभिजित बिचुकले यांना उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज दाखल करताच येथील राजकीय फोडणीला तेलाची धार द्यायला आपण आलो आहोत, अशी गर्जना बिचुकले यांनी केली होती. मात्र, कल्याण लोकसभेचा kalyan Lok Sabha प्रचार संपायला दोन दिवस शिल्लक असतानाही बिचुकले कुठे प्रचारात दिसलेच नाहीत.

Abhijit Bichukale
Shivsena News : लोकसभा निवडणुकीनंतर मोठा धमाका, ठाकरे-शिंदे एकत्र येणार; प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

अभिजित बिचुकले Abhijit Bichukale यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे सातारा लोकसभेच्या निवडणुकीनंतर बिचुकले कल्याणमध्ये kalyan Lok Sabha प्रचारात सक्रिय होतील, अशी शक्यता होती. मात्र, उमेदवार अर्ज दाखल केल्यानंतर गायब झालेले बिचुकले कोणालाच दिसले नाही. त्यांच्याशी संपर्क साधला असता मी डोंबिवली मध्येच आहे असे त्यांनी सांगितले. तसेच भेटून तुम्हाला माझा जाहीरनामा सांगतो असे देखील ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फोडणी बसलीच नाही

कल्याणमध्ये शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट ही चुरशीची लढाई होत आहे. या लढाईत अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले यांच्या एंट्रीनंतर ही निवडणुकीत बिचकुले प्रचारात काय बोलणार याची चर्चा होती. मात्र, आपल्या उलटसुलट वक्तव्यांनी चर्चेत असलेले बिचुकले कल्याणमध्ये मतदारांना दिसलेच नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे राजकीय फोडणी देण्यासाठी आलो असल्याचे सांगण्याऱ्या बिचुकलेंची फोडणी बसलीच नसल्याचे सांगितले जात आहे.

ठाण मांडूण बसणार

सातारा लोकसभा निवडणुकीतही अभिजित बिचुकले उमेदवार होते. तिसऱ्या टप्प्यात येथील निवडणूक झाली. अभिजित बिचुकले म्हणाले होती की सातारा येथील कामगिरी पार पडल्यानंतर पुढील 13 दिवस मी येथेच ठाण मांडून बसणार आहे. ते डोंबिवली दाखल पण झाले पण कधी, कुठे ते ठाण मांडून बसले आहेत ते ही कोणाला माहीत नाही.

(Edited By Roshan More)

Abhijit Bichukale
Ajit Pawar 'Not Reachable' : अजित पवारांच्या ‘नॉट रिचेबल’चे कारण आले पुढे; राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com