Vishwanath Bhoir: माझ्यावर बोलल्याशिवाय त्याचे दुकान कसे चालणार? शिवसेना आमदाराने इच्छुक अन् विरोधकांना सुनावले

Kalyan West Assembly Election: उमेदवार कोणी पण असू दे माझ्या पक्षातील असो किंवा बाहेरचे. जोपर्यंत ते विश्वनाथ भोईरवर टीका करीत नाही, तोपर्यंत ते मोठे होणार नाहीत...
Vishwanath Bhoir
Vishwanath BhoirSarkarnama
Published on
Updated on

Dombivli News: शिवसेना शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर (Vishwanath Bhoir) हे कल्याण पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. यंदाची निवडणूक लढण्यासाठी त्यांनी दंड थोपटले आहे. भोईर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात मिळणार, अशी एक चर्चा आहे.

दुसरीकडे शिंदे गटातून काही इच्छुक उमेदवारही आहेत. शिंदे गटातून नुकतेच ठाकरे गटात प्रवेश केलेले साईनाथ तारे यांनी देखील ठाकरे गटाकडून आपल्याला उमेदवारी मिळेल असा दावा करीत भोईर यांच्यावर विकास कामावरून टीका करीत आहे.

भोईर यांना येत्या निवडणुकीत ठाकरे गट आणि स्वतःच्या पक्षातील इच्छुक उमेदवारांचे आव्हान आहे.भोईर यांनी स्वपक्षातील इच्छुक आणि विरोधकांचा समाचार घेत त्यांना टोला लगावला आहे.

"जे इच्छुक उमेदवार आहेत ते आता काही ना काही बोलणार.माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांचे दुकान कसे चालणार, चालणारच नाही. ते उमेदवार कोणी पण असू दे माझ्या पक्षातील असो किंवा बाहेरचे. जोपर्यंत ते विश्वनाथ भोईरवर टीका करीत नाही, तोपर्यंत ते मोठे होणार नाहीत," अशा शब्दांत आमदार विश्वनाथ भोईर यांनी इच्छुक, विरोधी उमेदवारांना टोला हाणला आहे.

Vishwanath Bhoir
Ashti Assembly Elections 2024: महायुतीत पेच; भाजपच्या सुरेश धसांच्या उमेदवारीला विद्यमान NCP आमदाराचा विरोध; बंडखोरीचा इशारा

"इच्छुकांना काही ना काही बोलावे लागणार. मी येथील सिटींग आमदार आहे. माझ्यावर बोल्याशिवाय त्याचे दुकान कसे चालणार, चालणारचं नाही ना..,कोणी असू द्या माझ्या पक्षातील असो किंवा बाहेरील पक्षातील असो. जोपर्यंत ते विश्वनाथ भोईरवर टीका करणार नाही ते मोठे होणार नाहीत.

त्यांना आपण मोठे आहोत हे दाखवायचे असेल तर माझ्यावर बोलावेच लागेल," अशा खोचक शब्दांत भोईर यांनी विरोधकांचा समाचार घेतला. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेत घेत आपल्या कार्य अहवालाचे प्रकाशन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com