KDMC Political Twist: 'केडीएमसी'त धक्कादायक ट्विस्ट! निकालानंतर चारच दिवसांत ठाकरेंना मोठा धक्का; 4 नगरसेवक फुटले,नावंही आली समोर

Kalyan Dombivali Mahapalika Election Results: कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप 50 तर, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 53 जागा मिळाल्या आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 नगरसेवक निवडून आले आहेत.भाजप–शिवसेना युतीमध्ये लढले असून येथे युतीची सत्ता येणार आहे.पण सध्या दोन्ही पक्ष महापौरपदासाठी प्रचंड आग्रही आहेत.
KDMC .jpg
KDMC .jpgSarkarnama
Published on
Updated on

Kalyan Dombivali News: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून त्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निकालानंतर तेथील स्थानिक राजकारणात एकापाठोपाठ एक असे धक्कादायक ट्विस्टवर ट्विस्ट समोर येत आहे. भाजप–शिवसेनेनं महापौर पदासाठी चांगलाच जोर लावला असून राजकीय हालचालींनी वेग पकडला आहे. याचदरम्यान,आता केडीएमसीतून सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.

भाजप–शिवसेनेकडून आपलाच महापौर खुर्चीवर बसवण्यासाठी उद्धव ठाकरेंसह मनसेचेही नगरसेवक फोडण्याचं काम केलं जात असल्याचं समोर आलं आहे. अशातच आता उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) 4 नगरसेवक फुटल्याची चर्चा सुरू आहे. ते नॉट रिचेबल असल्याचं बोललं जात होतं. पण आता गट नोंदणी आणि गट नेता नोंदणीसाठी कोकण भवनात अकरापैकी सातच नगरसेवक दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.त्यामुळे ठाकरेंचे चार नगरसेवक फुटल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप (BJP) 50 तर, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 53 जागा मिळाल्या आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 नगरसेवक निवडून आले आहेत.भाजप–शिवसेना युतीमध्ये लढले असून येथे युतीची सत्ता येणार आहे.पण सध्या दोन्ही पक्ष महापौरपदासाठी प्रचंड आग्रही असून एकनाथ शिंदेंसह भाजपनंही ठाकरेंच्या शिवसेनेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांवर जाळं टाकण्यास सुरूवात केली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची 19 जानेवारी रोजी एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला 11 पैकी 09 नगरसेवकच उपस्थित होते.तर दोन नगरसेवक गैरहजर होते. मधूर म्हात्रे, कीर्ती ढोणे, स्वप्नाली केणे, राहुल कोट अशा चार गैरहजर असलेल्या नगरसेवकांची नावे आहेत.

KDMC .jpg
Shivsena UBT councillors : ठाकरेंचे सहा नगरसेवक ‘नॉट रिचेबल’? शिलेदाराचा थेट वार, विरोधकांच्या राजकारणाचा फेर फिरवला

या गैरहजेरीमुळे ठाकरेंच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे.त्यातच आणखी दोन नगरसेवक आधी नॉट रिचेबल आणि आता कोकणात भवनात अनुपस्थित राहिल्यानं एकूण ठाकरेंचे 4 नगरसेवक फुटले की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.कोकण विभागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाईही उपस्थित आहेत.

'केडीएमसी'त फोडाफोडीच्या राजकारणाला उधाण आले असतानाच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेत निवडून आलेल्या नगरसेवकांना टार्गेट देण्यात आलं आहे.दोन्ही नगरसेवकांना थेट अल्टिमेटम दिला आहे.दोन्ही नगरसेवकांनी 24 तासांच्या आत पक्षात सामील व्हावे अन्यथा अपात्रतेची कारवाई केली जाईल,अशी नोटीस या दोन्ही नगरसेवकांना बजावण्यात आली आहे.

KDMC .jpg
PMC NOTA: पुण्यात सर्वात हायव्होलटेज लढतीच्या प्रभागात NOTA चा दबदबा; पैशांचा महापूर येऊनही मतदारांनी ऐकला आतला आवाज

राज्यात रखडलेल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले असून दुसऱ्याच दिवशी (ता.16) मतमोजणी झाली आणि निकालही जाहीर करण्यात आला.या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून अनेक ठिकाणी महायुतीनं मोठा विजय मिळवला आहे.दरम्यान, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महापौर पदावरून भाजप–शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली असतानाच दुसरीकडे ठाकरे बंधूंचे नगरसेवक गेम चेंजर ठरत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com