KDMC Politics : महायुतीत वाद! शिंदेंच्या आमदार अन् भाजपच्या स्थायी अध्यक्षामध्ये जुंपली; 'क्रेडिट वॉर' भडकले!

Rajesh More vs Dipesh Mhatre : पिंपळेश्वर मंदिराच्या प्रश्नानंतर आता मोठागाव उड्डाणपुलामुळे महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.
The newly developed flyover has become the center of a political credit war between Rajesh More and Dipesh Mhatre in KDMC politics.
The newly developed flyover has become the center of a political credit war between Rajesh More and Dipesh Mhatre in KDMC politics.sarkarnama
Published on
Updated on

Mahayuti Politics : श्री पिंपळेश्वर मंदिराच्या जागेच्या प्रश्नावरून महायुतीतील भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत रंगलेला श्रेयवाद अद्याप थांबलेला नसतानाच आता मोठागाव रेल्वे उड्डाणपुलाच्या मुद्द्यावरूनही दोन्ही पक्षांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव येथील एलसी-१ रेल्वे उड्डाणपुलाच्या निविदा प्रक्रियेला गती देण्याची मागणी करत कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी गुरुवारी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे या पुलाला मंजुरी मिळाल्याचा उल्लेख करत मोरे यांनी निविदा तातडीने काढून काम सुरू करण्याची मागणी केली.

मोरे यांच्या भेटीनंतर काही तासांतच भाजपचे स्थायी समिती सदस्य दिपेश म्हात्रे यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत या प्रकल्पासाठी आपण गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत असल्याचा दावा केला. सुरुवातीच्या दोन पदरी पुलाऐवजी चार पदरी उड्डाणपूल मंजूर करण्यासाठी शासन आणि रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीतही आपण हा विषय उपस्थित केल्याचा उल्लेख त्यांनी केला.

The newly developed flyover has become the center of a political credit war between Rajesh More and Dipesh Mhatre in KDMC politics.
Uddhav Thackeray Setback : बाळ मानेंच्या हकालपट्टीनंतर ठाकरेंचा बडा नेता अस्वस्थ, शिवसेना सोडणार? भास्कर जाधवांनी मुद्द्यालाच हात घातला; 'ते मूर्ख, किंमत...'

विशेष म्हणजे, निवडणूक आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया रखडल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असताना, कोणताही विलंब न करता निविदा काढण्यात यावी, अशी मागणीही म्हात्रे यांनी केली आहे.

मोठागाव, मानकोली, गोपाळनगर, रेतीबंदर आणि डोंबिवली पश्चिम परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून या उड्डाणपुलाची प्रतीक्षा करत आहेत. त्यामुळे पुलाच्या कामाला गती देण्याची मागणी सर्वच स्तरांतून होत असली तरी त्याचे श्रेय कोण घेणार, यावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये पडद्यामागे चुरस सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

The newly developed flyover has become the center of a political credit war between Rajesh More and Dipesh Mhatre in KDMC politics.
Shivsena Vs BJP: अब हमारी बारी..! धक्क्यावर धक्के सहन केलेल्या उद्धव ठाकरेंसाठी दिलासादायक बातमी; भाजपला 'जोर का झटका'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com