Kiran Patil Arrested : गुंतवणुकीच्या अमिषाने तब्बल 2 कोटींची फसवणूक; उद्योगपती किरण पाटील अटकेत; १२ जण अडकले होते जाळ्यात

Investment Fraud : उच्च परताव्याचे आमिष, टीएलसी क्वाईनचा गाजावाजा आणि सुरक्षिततेच्या खोट्या हमीवर १२ गुंतवणूकदारांकडून १ कोटी ६० लाखांहून अधिक रक्कम उकळल्याचा आरोप; वाडा तालुक्यात खळबळ
 Kiran Patil Arrested
Kiran Patil Arrestedsarkarnama
Published on: 
Updated on: 

दिलीप पाटील

Crime News : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील पालसई येथील रहिवासी असलेले उद्योजक किरण पाटील यांनी अनेक नागरिकांना बीओटी बीआरओ कंपनीत गुंतवणूक केल्यास महिन्याकाठी 5 टक्के परताव्यासह दहा हजार रूपये किंमतीचे टी एलसी क्वाईन मिळेल असे

जास्त परताव्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांची 1 कोटी 60 लाख 45 हजार 500 रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी बुधवारी मध्यरात्री वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून किरण पाटील यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकाराने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जास्त परताव्याचे आमिष दाखवून उद्योजक किरण गोपाल पाटील यांनी अनेक नागरिकांकडून सन 2024 ते आजपर्यंत बीओटी बीआरओ या कंपनीमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली लाखो रूपये घेतले.

महिना 1 लाख रूपये गुंतवल्यास महिना 5 टक्के परतावा मिळेल व टी एल सी क्वाईन मोफत भेटतील.एका क्वाईनची किंमत बाजारात दहा हजार रूपये असल्याचे किरण पाटील यांनी नागरिकांना सांगितले तसेच तुम्ही गुंतवलेली रक्कम एकदम सुरक्षित आहे ती कोठेही जाणार नाही.आणि जर काही झाले तर तुम्ही गुंतविलेल्या रकमेची मी जबाबदारी घेतो.

माझी वाडा परिसरात 100 ते 200 करोडची मालमत्ता आहे.जर कंपनीने पैसे दिले नाहीत तर मी तुमचे पैसे परत देईन असे सांगितले यावर विश्वास ठेवून अनेक नागरिकांनी यामध्ये 1 कोटी 60 लाख 45 हजार 500 रूपये गुंतवले.

मात्र दोन वर्ष होऊनही कोणताही परतावा मिळत नसल्याने किरण यांच्याकडे नागरिकांनी परताव्याबाबत विचारणा करत होते पंरतू किरण पाटील हे वेगवेगळी काही ना काही कारणे देऊन पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते.काही दिवसांपासून किरण यांनी ठेवींदारांशी संपर्कही तोडला होता.

 Kiran Patil Arrested
Maharashtra Live Update : रेल्वे स्टेशनवर साफसफाई करणाऱ्या महिलेला एकाच महिन्याचे 2 लाख 18 हजार रुपये विजेचे बिल

पोलिसांकडून अधिक तपास सुरू

अखेर आपली याबाबत फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुडूस येथील ठेवीदार फिर्यादी प्रतिक्षा जाधव यांनी थेट पोलीस ठाणे गाठत फिर्याद नोंदवून गुन्हा दाखल केला. अनेक गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत किरण पाटील यांना अटक केली असून, फसवणुकीची रक्कम, इतर गुंतवणूकदार आणि आर्थिक व्यवहारांचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा पालघरचे सहायक पोलीस निरीक्षक सतिश आस्वर करीत आहेत.

 Kiran Patil Arrested
Pune Crime : 'सिया'च्या जाळ्यात अडकून पोलीस पाटलाची 56 लाखांची फसवणूक, व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होणं पडलं महागात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com