Ladki Vidyarthini : विद्यार्थिनींच्या शिक्षणाला आर्थिक बळ; ‘लाडकी विद्यार्थिनी’ योजना सुरू

Ladki Vidyarthini Yojana : मुलींना शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी ‘ज्योती कलानी लाडकी विद्यार्थिनी योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
Ladki Vidyarthini Yojana
Ladki Vidyarthini Yojanasarkarnama
Published on: 
Updated on: 

नवनीत बऱ्हाटे

Ulhasnagar News : दिवाळीच्या उत्साहात उल्हासनगरातील विद्यार्थिनींसाठी शिक्षणाची नवी पहाट उजाडली आहे. आर्थिक अडचणींमुळे मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, या उद्देशाने महापालिकेच्या ‘ज्योती कलानी लाडकी विद्यार्थिनी योजने’चा धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला.

पहिल्याच टप्प्यात १०१ विद्यार्थिनींना आर्थिक मदतीचा लाभ देण्यात आला असून, शहरातील हजारो विद्यार्थिनींसाठी ही योजना आशेचा किरण ठरणार आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुलींना शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी उल्हासनगर महापालिकेच्या वतीने ‘ज्योती कलानी लाडकी विद्यार्थिनी योजने’चा शुक्रवारी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला.

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात १०१ विद्यार्थिनींना आर्थिक मदतीचा लाभ देण्यात आला. या योजनेंतर्गत इयत्ता सातवी ते बारावीपर्यंतच्या पात्र विद्यार्थिनींना दरमहा ५०० रुपये, म्हणजेच वर्षाला सहा हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे.

शहरातील सुमारे १९ हजार ७०० विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता असून, महापालिकेच्या तिजोरीवर दरवर्षी सुमारे ९ कोटी ८७ लाख रुपयांचा आर्थिक भार पडणार असल्याची माहिती महापौर ॲड. अश्विनी कमलेश निकम यांनी दिली.

मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याबरोबरच आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये, हा योजनेचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Ladki Vidyarthini Yojana
Ulhasnagar politics : CM फडणवीसांनी नाव काढताच 'उल्हासनगर' चर्चेत : श्रीकांत शिंदे-ओम कलानींमुळे सरकला राजकीय केंद्रबिंदू

या कार्यक्रमाला महापौर अश्विनी निकम, सभागृह नेते अरुण आशान, नगरसेवक जमनू पुरस्वानी, पंचम कलानी, लीलाबाई आशान, इंदिरा पाटील, साक्षी सुर्वे, मीना सोंडे, डिंपल ठाकूर यांच्यासह कमलेश निकम, निखिल पाटील आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

भाजप नगरसेवक अनुपस्थित

कार्यक्रमाला भाजपचे नगरसेवक आणि उपमहापौर यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले. योजनेच्या नामकरणावरून यापूर्वीच राजकीय वाद निर्माण झाला असताना शुभारंभ कार्यक्रमातील भाजपच्या अनुपस्थितीने पुन्हा राजकीय मतभेद अधोरेखित झाले आहेत. दरम्यान, योजनेचे निकष, अर्जप्रक्रिया आणि उर्वरित पात्र विद्यार्थिनींपर्यंत प्रत्यक्ष लाभ कधी पोहोचणार, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Ladki Vidyarthini Yojana
Solapur Politic's : सोलापुरात मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा : भाजप आमदार अन्‌ काँग्रेस शहराध्यक्षांमध्ये हमरीतुमरी; माजी उपमहापौर, पोलिसांची मध्यस्थी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.