Raj Thackeray Panvel Speech: फोडाफोडी न करता पक्ष उभा करायला शिका; राज ठाकरेंनी फडणवीसांनाच सुनावले

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "तीच लोकं नंतर गाडीत आतमध्ये झोपून जाणार.."
Raj Thackeray : Devendra Fadnavis
Raj Thackeray : Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Panvel News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पनवेल इथे निर्धार मेळावा पार पडत आहे. यावेळी अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी महाराष्ट्रात सुरू असलेल्या फोडाफोडीचं राजकारणही त्यांनी भाष्य केलं आहे. भाजप - राष्ट्रवादीच्या नव्या सत्तासमीकरणावरही त्यांनी सडकून टीका केली आहे. (Latest Marathi News)

राज ठाकरे म्हणाले, "भारतीय जनता पक्षाने दुसऱ्यांचे आमदार न फोडता स्वत:च्या जीवावर पक्ष उभा करायला ही शिकावा. लोकांच्या कानपट्टीवर बंदुका ठेवायच्या आणि पक्षात ओढून आणायचे आणि तीच लोकं नंतर गाडीत आतमध्ये झोपून जाणार, काय चाललंय? महाराष्ट्रात निर्लज्जपणाचा कळस सुरू आहे, अशा शब्दात राज यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांवर निशाणा साधला.

"सरकारमध्ये जाण्याआधी अजित पवारांचीपंतप्रधान मोदींनी जे काही काढले आहे, म्हणजे मोदींनी ७० हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप करताच, हे सगळे टुनकन उडी मारून भाजपसोबत गेले," अशा शब्दात राज यांनी भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचाही समाचार घेतला.

Raj Thackeray : Devendra Fadnavis
Praniti Shinde On NCP: मावळ आपलं असणार; 'समझनेवाले को इशारा काफी है' सांगत प्रणिती शिंदेंचं राष्ट्रवादीला थेट आव्हान

राज ठाकरे पुढे म्हणाले, "२००७ मध्ये मुंबई-गोवा महामार्गाचं काम सुरु झालं. त्यानंतर इतकी सरकारे आली पण कोणत्याही सरकारने मुंबई- गोवा रस्त्याचं काम केलं नाही. इतक करूनही जनता त्याच लोकांना कशी निवडून देते ? रस्ते खड्ड्यात गेले काय आणि आपण खड्ड्यात गेलो काय मतदारांना काहीच वाटत नाही?"

Raj Thackeray : Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar News : शरद पवारांना भाजपसोबत आणण्याच्या मोदींच्या अटीचा दावा वडेट्टीवारांनी का केला ?

"आत्तापर्यंत मुंबई गोवा महामार्गावर खर्च झालेला पैसा १५ हजार ६६६ कोटी रुपये आहे. तरीही या रस्त्याची गंभीर अवस्था आहे. फक्त काहींच्या तुंबड्या भरल्या गेल्या. मी नितीन गडकरींना विनंती केली होती की, जर राज्य सरकारला जमत नसेल तर तुम्ही घ्या तर, ते म्हणाले की 'अहो कॉन्ट्रॅक्टर पळून जातात.' हे नेमकं मुंबई गोवा हायवेच्या बाबतीतच का घडलं? कोकणाचा विकास होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करतंय का?" अशी शंकाही राज ठाकरेंनी उपस्थित केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com