Uddhav Thackeray News: ठाकरेंनी शिंदे गटावर मुंबईत पहिला मोठा डाव टाकला; कीर्तीकरांच्या मुलालाच दिली उमेदवारी

Loksabha Election 2024 : वडील गजानन कीर्तिकर हे जरी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात गेले असले तरी त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Uddhav Thackeray- Amol Kirtikar
Uddhav Thackeray- Amol Kirtikar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. पक्ष, चिन्ह गमावल्यानंतर ठाकरेंनी परत पक्षबांधणी आणि कार्यकर्त्यांमध्ये हुंकार भरण्यासाठी राज्यभर दौरे सुरू केले आहेत. याचवेळी आता ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.याच पार्श्वभूमीवर आता ठाकरेंनी शिंदे गटावर मुंबईत पहिला मोठा डाव टाकला आहे. त्यांनी उत्तर पश्चिम मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी घोषित केली आहे.विशेष म्हणजे त्यांचे वडील गजानन कीर्तीकर हे सध्या शिंदे गटात आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जोगेश्वरी पूर्व परिसरात जनसंवाद सभा शनिवारी( ता.९) पार पडली. यावेळी ते बोलत होते. ईडी कारवाईमुळे आमदार रवींद्र वायकर हे शिंदे गटात प्रवेश करणार अशा चर्चाही सुरु झाल्या होता. मात्र, ते आज ठाकरेंच्या संवाद यात्रेत सहभागी झाले.त्यामुळे सध्या तरी रवींद्र वायकरांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. याचवेळी त्यांनी ठाकरेंनी अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी घोषित केली.

Uddhav Thackeray- Amol Kirtikar
Jalna Loksabha Politics : अर्जुन खोतकरांच्या पोटातलं ओठावरं आलंच, म्हणाले, 'दानवेंना उमेदवारी मिळाली नाही तर आनंदच...'

वडील गजानन कीर्तिकर हे जरी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात गेले असले तरी त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. अमोल कीर्तिकर(Amol Kirtikar) हे उद्धव ठाकरे गटात उपनेते या पदावर आहेत. उमेदवारी निश्चित झाल्यापासून अमोल कीर्तीकर यांच्याकडून संपर्क अभियान सुरू करण्यात आले होते तर दुसरीकडे गजानन कीर्तीकरही पुन्हा निवडणुकीच्या जुळवाजुळवीला लागले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तपास यंत्रणांचा ससेमिरा

खिचडी घोटाळा प्रकरणात शिंदे गटातील खासदार गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्र अमोल यांच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीत. वडील गजानन कीर्तीकर यांना शिंदे गट आणि भाजपची साथ असली तरी ठाकरे गटात असलेल्या अमोल कीर्तीकरांमागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. अमोल हे ठाकरे गटात असल्याने भाजपने शिंदेंच्या मागून त्यांच्यामागे चौकशीचा फेरा लावल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

Uddhav Thackeray- Amol Kirtikar
Mahayuti Seat Shairing News : महायुतीचे ठरेना; एकनाथ शिंदे, अजित पवारांना सतावतेय 'ही' भीती !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com