Shivsena UBT News : शिंदे, पवार गटाच्या नेत्यांना कमळावर लढावे लागणार : सचिन अहिरांनी सांगितली आतली गोष्ट

BJP भाजपकडून लोकसभेच्या २३ जागांसाठी निरीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. विविध आमदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Eknath Shinde, Sachin Ahir, AJit Pawar
Eknath Shinde, Sachin Ahir, AJit Pawarsarkarnama

Shivsena UBT News : भाजपने लोकसभेच्या २३ जागांवर निरिक्षकांची नेमणूक केलेली आहे. उर्वरित जागांवर शिंदे गट शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला समाधान मानावे लागणार आहे. तर काही लोकांना भाजपच्या चिन्हावर लढावं, असं सांगितलं जात आहे. या दोन्ही गटातील काहीनी यासाठी तयारी केली आहे, असा दावा उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे सचिन अहिर यांनी केला आहे.

राज्यात लोकसभेच्या निवणडणुकीसाठी भाजपच्या २३ जागा पक्क्या आहेत. भाजपकडून लोकसभेच्या २३ जागांसाठी निरीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. विविध आमदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपकडून बारामती व सातारच्या जागेसाठी निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

बारामती व सातारची जागा ही अजित पवार (Ait Pawar) गटाला मिळण्याची शक्यता आहे. नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेसाठी भाजपकडून निरीक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. या जागांसाठी शिंदे गट आग्रही आहे. भाजपकडून लोकसभेच्या मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, पुणे, नागपूर, भिवंडी, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, रावेर, अहमदनगर, बीड, लातूर, जालना, नांदेड, वर्धा, अकोला, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, सोलापूर, माढा, सांगली या २३ जागांवर निरीक्षक नेमले आहेत.

Eknath Shinde, Sachin Ahir, AJit Pawar
Latur BJP Politcal News : बसवराज पाटलांच्या भाजप प्रवेशानंतर फडणवीसांच्या लाडक्या आमदाराचं काय होणार?

यासंदर्भात आज उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी म्हटले की, भाजपने लोकसभेच्या २३ जागांवर निरिक्षकांची नेमणूक केलेली आहे. उर्वरित जागा या शिंदे गट व अजित पवार गट यांच्यासाठी आहेत. यावेळेस काही लोकांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवा, असं सांगितलं जात आहे. या दोन्ही गटातील काहींनी त्यासाठी तयारीही दर्शवली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिरुरची जागा राष्ट्रवादी लढवणार आणि मावळची जागा ही आम्हाला मिळेल, असे सांगून अहिर म्हणाले, अजित पवार यांना शरद पवारांमुळे कामाची संधी मिळाली हे ते नाकारू शकत नाहीत. शिवाजीराव आढळराव पाटील ज्या कारणासाठी ते बाहेर पडले आज तेच अजित पवार गटाकडे जात असल्याची चर्चा आहे, या प्रश्नावर अहिर म्हणाले, त्यांना मतदारांकडे जाण्याचा नैतिक अधिकार आहे का, असा सवाल त्यांनी केला.

Edited By : Umesh Bambare

Eknath Shinde, Sachin Ahir, AJit Pawar
Sachin Ahir News : मावळमधून ठाकरेंचाच उमेदवार लोकसभेत जाणार, राष्ट्रवादीचं...; सचिन अहिरांचा दावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com