Beed Political : महाराष्ट्राच्या इतिहासात पाचशेपेक्षा अधिक गाड्यांचा ताफा घेऊन शिवसेनेत प्रवेश करणारा अनिल जगताप हा पहिला शिवसैनिक आहे. आजपर्यंत बाळासाहेब तथा शिवसेनेविषयी असणारी अनिलची निष्ठा आणि प्रामाणिकता पायदळी तुडवण्याचे काम करण्यात आले. परंतु, सामान्यांचा मुख्यमंत्री, बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक एकनाथ शिंदे कधीच अनिल जगताप यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
आजवर बीडकडे अनेकांनी दुर्लक्ष केले, पण इथून पुढे बीडवर माझे विशेष लक्ष राहील, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेना गटाचे माजी जिल्हाप्रमुख व माजी जिल्हा सहसंपर्कप्रमुख अनिल जगताप यांनी मुंबईत वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षांपासून बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना अनिल जगताप यांनी बीडमध्ये जिवंत ठेवली. पण उद्धव ठाकरे यांनी बीड जिल्ह्याकडे आणि वैयक्तिक त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. पण आता असे होणार नाही. अनिलची निष्ठा आणि प्रामाणिकता मला माहीत आहे. त्यामुळे इथून पुढे बीडकडे माझे विशेष लक्ष राहील.
महाराष्ट्र राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण अनेक निर्णय घेतले, अनेक प्रश्न सोडवले, महिला सक्षमीकरण असेल तसेच गोरगरीब शेतकऱ्यांसाठीदेखील आपण पुढाकार घेऊन त्यांच्या अडचणी सोडवल्या. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवण्याचा प्रयत्न आपण सरकारच्या माध्यमातून करीत आहोत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थी विद्यार्थिनी यांना दिलासा देणारे अनेक निर्णय आपण आजवर घेतले असून ते लोकांपर्यंत पोहोचवून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कामाला लागा, असे आवाहन यावेळी केले. अनेकांना वाटलं हे टिकणार नाहीत, याचं सरकार पडणार, पण बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेत दररोज प्रवेश होत आहेत.
बीडमध्ये शिवसेनेचा मेळावा होणार आहे. निश्चितच यावेळी उपस्थित राहीन. बीडवासीयांसाठी मी अनेक सेवा देण्याचे काम करणार आहे. आमदार भरत गोगावले, आरोग्यसेवक बाजीराव चव्हाण, बीड शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
बीडमध्ये शक्तिप्रदर्शन
दरम्यान, अनिल जगताप यांनी शिवसेना प्रवासातही जाताना बीडमध्ये शक्तिप्रदर्शन केले. पाचशे वाहनांची फेरी काढून महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून ते मुंबईला रवाना झाले.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.