Devendra Fadnavis: महायुतीत जागावाटपाचे अधिकार फडणवीसांना; 'या' मुद्यांच्या आधारे सुटणार जागा

Maharashtra Assembly Election : गेल्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाने ज्या जागा जिंकल्या त्या जागा त्याच पक्षाकडे राहील मात्र काही मोजक्या जागा आहेत, त्यामध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis
Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

BJP News : महायुतीत भाजप हाच मोठा भाऊ असल्याने विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात (Maharashtra Assembly Election) देखील त्याचा मोठा वाटा असणार आहे. राज्यातील भाजप नेत्यांनी केंद्रातील नेतृत्वाकडे मोठा वाटा (अधिकच्या जागा) मागितला आहे. महाराष्ट्रात भाजपाने 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात असे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे.

राज्यात किती जागा लढवायच्या याचा निर्णय घेण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर दिल्लीश्वरांनी सोपवली आहे. भाजपला किती जागा मागायच्या आणि अन्य पक्षांना किती जागा द्यायच्या याचा निर्णय घेण्याची जबाबदारी भाजपने फडणवीसांवर सोपवली आहे.

भाजपच्या कोअर कमिटीच्या नुकतीच बैठक झाली. यात जागा वाटप आणि विधानसभेची रणनीती यावर चर्चा झाली. फडणवीस यांना जागा निश्चितीचा अधिकार कोअर कमिटीच्या बैठकीत देण्यात आल्याचीही माहिती आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विधानसभा निहाय मिळालेली मते आणि गेल्या विधानसभेत मिळालेली मते त्याचप्रमाणे सर्वेक्षण अहवाल याच्या आधारे विधानसभा निहाय उमेदवार निवडले जाणार असल्याचे बोलले जाते.

गेल्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाने ज्या जागा जिंकल्या त्या जागा त्याच पक्षाकडे राहील मात्र काही मोजक्या जागा आहेत, त्यामध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. जिंकून येण्याची खात्री असलेला उमेदवार महायुतीतील कोणत्या पक्षाकडे आहे, याबाबत लोकसभा निकाल व सर्वेक्षण अहवाल याचा आधार घेतला जाणार आहे, असे समजते.

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis
Sanjay Pandey: Video 'खाकी'ला 'खादी'ची भुरळ; 'तिहार'ची हवा खाऊन आलेल्या माजी पोलिस आयुक्तांना व्हायचंय आमदार!

भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत आज मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात विभागनिहाय मॅरेथॉन बैठक घेण्यात येत आहे. बैठकीमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील पाच महामंत्र्यांकडून विभागीय संघटनात्मक आढावा घेतला जात आहे.

बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,महामंत्री संजय केनेकर,विजय चौधरी,विक्रांत पाटील,माधवी नाईक,चित्रा वाघ आणि श्रीकांत भारतीय उपस्थित राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने बैठकीत कोणते निर्णय घेतले जातात,याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

या मुद्यांच्या आधारे जागावाटप

  • जिंकलेली जागा ज्या त्या पक्षाकडे जाईल

  • गेल्या वेळेची मते, सर्वेक्षण अहवालातून उमेदवारांची निवड

  • मोजक्या जागांमध्ये फेरबदलाची शक्यता

  • जिंकून येण्याची क्षमता असणाऱ्या नेत्यांना उमेदवारी देणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com