Shiv sena : म्हणून आम्ही शिवसेना फोडली ; भाजपच्या बड्या नेत्यानं सांगितलं कारण..

Shiv sena |शिवसेनेने देखील महाराष्ट्रात असाच विश्वासघात केला होता, म्हणून आम्ही शिवसेना फोडली. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांनाच आम्ही तोडले,"
Sushil Kumar Modi
Sushil Kumar Modisarkarnama

पाटणा : बिहारमध्ये नितीशकुमार आज (बुधवार) आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.नितीशकुमार (nitish kumar) यांनी भाजपाला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखविला आहे. भाजपाने जदयू फोडण्यासाठी ऑपरेशन लोटस चालविल्याचा आरोप नितीशकुमार यांनी केला आहे. यातून सावध होत त्यांनी पक्ष वाचविला, असा दावा त्यांनी केला आहे.

नितीश कुमार यांनी काल (मंगळवारी) राजीनामा दिल्यानंतर भाजप आक्रमक झाला आहे. महाराष्ट्रात शिवसेना का फोडली याचं कारण भाजपच्या एका बड्या नेत्याने दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, शिवसेना फोडल्याचे कारण सांगतांना त्यांनी अप्रत्यक्षपणे नितीशकुमार यांना इशारा दिला आहे.

"2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी NDA आघाडी अंतर्गत निवडणूक लढवली होती आणि जनतेने JDU आणि BJP ला पाठिंबा दिला होता. जेडीयूने बिहारचा विश्वासघात केला आहे. मतदारांनी दिलेल्या मतांशी खेळले आहेत," असा आरोप बिहारचे भाजपा नेता आणि माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे.

Sushil Kumar Modi
Nitish Kumar एकवीस महिन्यांत दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ; बिहारमध्ये पुन्हा चाचा-भतीजा सरकार

"आम्ही 74 जागा जिंकण्यात यशस्वी झालो, पण पंतप्रधानांनी दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण केले आणि एनडीए आघाडीत नितीशकुमार मुख्यमंत्री झाले. पण आज जे काही घडले तो बिहारच्या जनतेशी आणि भाजपसोबतचा विश्वासघात आहे. शिवसेनेने देखील महाराष्ट्रात असाच विश्वासघात केला होता, म्हणून आम्ही शिवसेना फोडली. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांनाच आम्ही तोडले," असा इशारा मोदी यांनी दिला.

"नितीश कुमार यांना राजदमध्ये तो आदर मिळणार नाही जो त्यांनी भाजपसोबत असताना मिळवला. आम्ही त्यांना अतिरिक्त जागा न घेता मुख्यमंत्री बनवले. अडथळा आणण्याचा प्रयत्न केला नाही," असेही सुशीलकुमार मोदी म्हणाले.

नितीश कुमार आज (बुधवारी) दुपारी 2 वाजता पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 21 महिन्यांत ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 17 वर्षांत ते आठव्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत, बिहारच्या इतिहासात हा एक विक्रम आहे. नितीश यांच्यासोबत आरजेडी नेते आणि लालू प्रसाद यादव यांचे धाकटे सुपुत्र तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

काल (मंगळवारी) संध्याकाळी नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांना 7 पक्षांच्या 164 आमदारांचे समर्थन पत्र सादर केले होते. नितीश यांच्यासोबत तेजस्वी यादवही राजभवनात उपस्थित होते. नितीश आणि तेजस्वी यांनी सरकार स्थापनेचा दावा मांडल्यानंतर राजभवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी तेजस्वी यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com