Maharashtra Khate Vatap: खाते वाटप तर झालं; पण भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीकडे किती अन् कोणती खाती? मंत्रिमंडळात कुणाचा वरचष्मा

Maha Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; सरकारमधील तिन्ही पक्षापैकी कोणत्या पक्षाकडे जास्त मंत्रीपदे?
Maharashtra Khate Vatap
Maharashtra Khate VatapSarkarnama
Published on
Updated on

Political News: मागील एक आठवड्यापासून खाते वाटपावरून सुरू असलेला तिढा अखेर आज सुटला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर खाते वाटप जाहीर झाले नव्हते. अखेर आज यावर शिक्कामोर्तब झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं तर धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खातं देण्यात आलं आहे.

राष्ट्रवादीला (अजित पवार गट) अर्थ, कृषी, सहकार, अन्न व नागरी पुरवठा आणि महिला व बालकल्याण यासह आदी महत्वाचे खाते देण्यात आले आहेत. तर शिवसेनेच्या आणि भाजपच्या काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. यामध्ये शिवसेनेकडून तीन आणि भाजपच्या मंत्र्यांकडून सहा खाती काढून राष्ट्रवादीला (अजित पवार गट) देण्यात आले आहेत.

Maharashtra Khate Vatap
Maharashtra Khate Vatap: अखेर खाते वाटप जाहीर; अजितदादांकडे अर्थ तर धनंजय मुंडेंकडे कृषी; कुणाला कोणतं खातं? पाहा यादी

या मंत्र्यांच्या खात्यात फेरबदल

अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषी खाते काढून आता त्यांच्याकडे अल्पसंख्याक विकास खाते देण्यात आले आहे. तर संजय राठोड यांच्याकडून अन्न आणि औषध प्रशासन काढून आता मृदा आणि जलसंधारण देण्यात आलं आहे. तर अतुल सावे यांच्याकडून सहकार खाते काढून त्यांना ओबीसी कल्याण खातं देण्यात आलं आहे.

या खाते वाटपाच्या पार्श्वभूमीवर आणि काही खात्यात करण्यात आलेल्या फेरबदलाच्या अनुषंगाने आता राज्य सरकारमधील तिन्ही पक्षाचे नेमकं किती मंत्री या मंत्रिमंडळात आहेत? तसेच त्यांच्याकडे कोणते खाते देण्यात आले आहे? अर्थात मंत्रिमंडळात कुणाचा वरचष्मा असणार आहे, याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात...

Maharashtra Khate Vatap
Dhananjay Munde News : दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या धनंजय मुंडेंनी मिळवलं वजनदार खातं!

शिंदे गटाकडे किती आणि कोणते खाते?

  • - एकनाथ शिंदे : मुख्यमंत्री, सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क

  • - गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा व स्वच्छता

  • - दादा भुसे : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

  • - संजय राठोड : मृद व जलसंधारण

  • - संदीपान भुमरे : रोजगार हमी योजना व फलोत्पादन

  • - उदय सामंत : उद्योग

  • - तानाजी सावंत : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

  • - रवींद्र चव्हाण : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)

  • - अब्दुल सत्तार : अल्पसंख्याक विकास व पणन

  • - दीपक केसरकर : शालेय शिक्षण विभाग

  • - अतुल सावे : गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण

  • - शंभूराज देसाई : राज्य उत्पादन शुल्क

Maharashtra Khate Vatap
Abdul Sattar News : अब्दुल सत्तारांना 'जोर का झटका धीरे से!' ; कृषी मंत्रालय काढून दिलं 'हे' खातं

भाजपकडे किती आणि कोणते खाते?

  • - देवेंद्र फडणवीस : उपमुख्यमंत्री, गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, उर्जा, राजशिष्ट्रचार

  • - राधाकृष्ण विखे पाटील : महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास

  • - सुधीर मुनगंटीवार : वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

  • - चंद्रकांत पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

  • - विजयकुमार गावित : आदिवासी विकास

  • - गिरीष महाजन : ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन

  • - मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता

  • - सुरेश खाडे : कामगार मंत्रालय

Maharashtra Khate Vatap
Pandharpur-Mangalveda Politic's : अजित पवारांच्या भाजप पाठिंब्याचे आमदार समाधान आवताडेंना ‘टॉनिक’...

अजित पवारांच्या गटाकडे किती खाते?

  • - अजित पवार : उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन

  • - धनंजय मुंडे : कृषीखातं

  • - संजय बनसोडे : क्रीडा व युवक कल्याण, बंदरे

  • - दिलीप वळसे पाटील : सहकार खातं

  • - छगन भुजबळ : अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

  • - आदिती तटकरे : महिला बालविकास मंत्री

  • - हसन मुश्रीफ : वैदकीय शिक्षण खातं

  • - अनिल पाटील : मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन

  • - धर्मरावबाबा आत्रम : अन्न व औषध पुरवठा

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com