मुंबई : सेवानिवृत्त तसेच सध्या सेवेत कार्यरत असलेल्या पोलिसांना (Maharashtra Police)बीडीडी पुनर्विकासांतर्गत 50 लाखांत घरे देण्याची घोषणा राज्य सरकारने नुकतीच केली आहे. त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय पोलिसांबाबत घेतला आहे. (Maharashtra Police latest news)
गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र पोलिसांना (Maharashtra Police) सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. यानिमित्ताने गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारचा आणखी एक निर्णय बदलला आहे. या निर्णयाने पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलेल्या या निर्णयामुळे ठाकरे सरकारचा आणखी एक निर्णय बदलण्यात आला आहे. आता कॉन्स्टेबल रँकच्या कर्मचाऱ्यांना खात्यांतर्गतच 20 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळाक DG लोन (DG loan) ही सुविधा बंद करण्यात आली होती, ही सुविधा फडणवीसांनी पुन्हा सुरु केली आहे. एका वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.
DG लोनसाठी जेवढा निधी आवश्यक होता, तो निधी देण्यात आला आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे आता पोलिसांना खात्यांतर्गतच 20 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलात DG लोन ही एक महत्त्वाची योजना आहे.
या योजनेनुसार कॉन्स्टेबलपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना खात्यामार्फतच सहज 20 लाखांपर्यंतचं कर्ज उपलब्ध केलं होते. ठाकरे सरकारने ही योजना बंद केली होती. त्यामुळे पोलिसांमध्ये नाराजी होती. आता पुन्हा एकदा फडणवीसांनी ही योजना सुरु केल्याने पोलिस दलात आनंदाचे वातावरण आहे.
बीडीडी चाळीतील पोलिसांना 15 लाखात घर मिळणार आहे. त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. बीडीडी चाळ पुनर्विकासात पोलिसांना 15 लाख रुपयांमध्ये घरे देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.