Mumbai News, 19 Apr : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युती संदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे. आमच्याते वाद आणि भांडणं खूप किरकोळ आहेत.
त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि वाद शुल्लक असल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता दोन्ही ठाकरे बंधू आपापसातील वाद मिटवून एकत्र येणार का? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं.
अशातच आता राज (Raj Thackeray) यांच्या वक्तव्यावर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी राज यांच्यासोबत जाण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, यावेळी त्यांनी राज यांना काही अटी शर्थी घातल्या आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले, मी देखील आमच्यातील किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. मराठी माणसांच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी एक अट आहे. ती म्हणजे आम्ही लोकसभेच्या वेळी सांगत होतो की, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये कारभार घेऊन जात आहेत, त्याचवेळी जर त्यांना विरोध केला असता तर हे सरकार बसलं नसतं.
महाराष्ट्राच्या हिताचं सरकार केंद्रात बसलं असतं आणि हे काळे कामगार कायदे फेकून दिले असते. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आणि आता विरोध करायचा. मग तडजोड करायची असं चालणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राज यांनी भाजपला लोकसभेला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरून सुनावलं. शिवाय जो कोणी महाराष्ट्राच्या हिताच्या आड येईल, त्याच स्वागत मी करणार नाही, त्याला घरी बोलावणार नाही, त्याचं आदरातिथ्य करणार नाही.
त्याच्याबरोबर पंगतीलाही बसणार नाही आही हे ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा, असंही ते राज यांना उद्देशून म्हणाले. दरम्यान, आमच्यात भांडण नव्हतंच, तरीही आमच्यातलं भांडणं मिटवल्याचं मी जाहीर करतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे सर्व मराठी माणसांनी ठरवायचं की भाजपबरोबर जायचं की माझ्याबरोबर यायचं.
मग काय द्यायचा तो बिनशर्त पाठिंबा द्या. महाराष्ट्राचं हित ही एकच शर्थ माझी आहे. पण मग बाकीच्यांना गाठीभेटी आणि कळत नकळत प्रचार करायचा नाही, अशी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्यायची आणि मग टाळी द्यायची असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज यांच्या युतीबाबतच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.