Uddhav Thackeray On Raj Thackeray : राज ठाकरेंच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंचे उत्तर; म्हणाले, ' माझ्याकडून भांडणे नव्हती, मिटवून टाकली...'

Uddhav Thackeray Responds to Raj Thackeray Propose : तेव्हाच ऐकले असते तर महाराष्ट्राच्या हिताचे सरकार आपण केंद्रात बसवले असते, असे उद्धव ठाकरे राज ठाकरेंना उद्देशून म्हणाले.
Raj Thackeray | Uddhav Thackeray
Raj Thackeray | Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray On Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये आपण उद्धव ठाकरेंसोबतीची छोटी भांडण मिटवण्यास तयार असल्याचे म्हटले होते. त्यांनी उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव देखील दिला. राज यांच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंना कामगार सेनेच्या कार्यक्रमातून उत्तर दिले.

उद्धव ठाकरे म्हणाले, 'माझ्याकडून भांडणं नव्हतीच आज मिटवून टाकली. राज्यासाठी भांडणं बाजुला ठेवायला तयार आहे. मात्र माझ्यासोबत जाऊन हीत की भाजपसोबत जाऊन हित ते आधी ठरवा.'

'लोकसभेला सांगत होतो हे सगळे उद्योग गुजरात घेऊन जात आहेत. तेव्हाच ऐकले असते तर महाराष्ट्राच्या हिताचे सरकार आपण केंद्रात बसवले असते. पण तेव्हा पाठींबा द्यायचा आता विरोध करायचा परत पाठींबा द्यायचा मग परत तडजोड करायची,असं चालणार नाही.', असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray | Uddhav Thackeray
Thackeray Politics : मोठी बातमी! राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव; म्हणाले, 'आमच्यातील भांडणं छोटी पण ...'

'महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही. त्याला घरी बोलणार नाही त्याच्या घरी जाणार नाही. त्याच्यासोबत पंगतीला बसणार नाही.', असे देखील उद्धव ठाकरे राज यांचे नाव न घेता म्हणाले.

शिवसेना की भाजप ठरवून टाका

उद्धव ठाकरे म्हणाले, मी माझ्याकडून सांगतो माझ्याकडून भांडणं नव्हतीच कधी, मिटवून टाकली चला. पण पहिलं हे ठरवा सगळ्या मराठी माणसांनी भाजपसोबत जायचं की शिवसेनेसोबत जायचं ते.

राज ठाकरे नेमके काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांनी एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना देखील ते म्हणाले की, राज ठाकरे म्हणाले, मी युतीसाठी उद्धव ठाकरेंना प्रस्ताव पाठवला आहे. आमच्यातील भांडणं छोटी आहेत पण महाराष्ट्र खूप मोठा आहे.महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्यामध्ये काहीच चूक नाही.

Raj Thackeray | Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या नेतृत्वाची संधी कोणामुळे? कोण कोणाला दत्तक घेणार; गहिनीनाथ गडावर CM फडणवीसांची 'मोठी' कबुली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com