

Gokul Politics: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघ हा रोज घडणाऱ्या अंतर्गत घटनांमुळे राज्यभरात चर्चेत आला आहे. महायुतीमधील वाद मिटला असताना महायुती विरुद्ध आमदार सतेज पाटील असा संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. गोकुळ दूध संघातील ४२७ दूध संस्था मतदानाला अपात्र केल्यानंतर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर एका रात्रीत गेम फिरला. अचानक यातील २७० संस्था मतदानाला पात्र झाल्याची माहिती समोर येत आहे. अचानक झालेल्या चमत्कारामुळे गोकुळच्या संस्था चालकांना दिलासा मिळाला. मात्र, या संस्था विनाकारण अपात्र ठरवण्याचे षडयंत्र कोणाचे होते? असा संशोधनाचा विषय बनला आहे.
गोकुळमधील वाढीव सभासदांना या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर १,३२० दूध संस्थांची चौकशी सुरू आहे. अशातच मध्यंतरी तक्रारातील ४२७ दूध संस्था या एक जून रोजी मतदानाला अपात्र ठरवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सर्वाधिक करवीर, भुदरगड, आजरा आणि राधानगरीतील दूध संस्था होत्या. सर्वाधिक दूध संस्था या महायुतीतील असल्याने गोकुळच्या राजकारणात खळबळ उडाली होती.
मतदानाला अपात्र ठरविण्यात आलेल्या ४२७ दूध संस्थांच्या न्याय व हक्कासाठी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला होता. या संदर्भात आज सकाळी कोल्हापूर सर्किट बेंच येथे काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या गटाकडून याचिका दाखल करण्यात आली.
मात्र, तत्पूर्वी ४२७ मधील २७० संस्था या पुन्हा यादीत घेतल्याची माहिती समोर येत आहे. या संस्थांबाबत अचानक यू टर्न घेतल्याने गोकुळमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. तसेच १५७ संस्था पावसाळ्यात निघालेल्या १३२० संस्थांमधीलच असल्याने त्यांची सुनावणी २ जुलैपर्यंत होणार आहे. तत्पूर्वी या २७० दूध संस्थांना ठरावाचं मसुदा पत्र पाठवण्याचे काम सुरू केले आहे.
दरम्यान, प्रशासकांकडूनच आम्हाला जो पात्र/अपात्र संस्थाचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये ज्या पात्र संस्थांना मसुदापत्र पाठवायचे आहेत, त्याच संस्थांना आम्ही पत्रं पाठवली. शिवाय ज्या १५७ संस्था आहेत त्या आवसानातील असल्याने त्यांची कारवाई सुरू असल्याची माहिती सहाय्यक दुग्धनिबंधक कृष्णा ठाकरे यांनी सरकारनामाशी बोलताना दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.