शरद पवार अध्यक्ष असलेली कुस्तीगीर परिषद बरखास्त

Sharad Pawar Latest news| राज्यात कुस्ती संचलनासाठी ॲड हॉक समितीची निवड करण्यात येणार आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar Sarakarnama
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या सत्ताबदलानंतर नवे सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. एकापाठोपाठ एक निर्णय सरकार घेताना दिसत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आरेतील मेट्रोकारशेडच्या निर्णयानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना धक्का बसला आहे.

नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत भारतीय कुस्ती संघटनेने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद (Maharashtra State Wrestling) बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. शरद पवार हे या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून राज्यात कुस्ती स्पर्धा भरवणे आणि इतर निर्णय घेतले जातात. आता लवकरच राज्यात कुस्ती संचलनासाठी ॲड हॉक समितीची निवड करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीसह इतर निर्णय घेतले जातील.

राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याच कारणं काय?

देशात कुस्ती खेळप्रकारात महाराष्ट्राचा एक मोठा नावलौकीक आहे. महाराष्ट्राच्या मल्लांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. पण गेल्या काही दिवसात भारतीय कुस्ती संघटनेच्या काही प्रस्तावांना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. इतकेच नव्हे तर राज्यातील मल्लांनाही राज्य कुस्तीगीर परिषदेबाबत तक्रारी केल्या होत्या.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने 15 वर्षाखालील गटासाठी कुस्ती स्पर्धा आणि 23 वर्षाखालील गटासाठी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, ही बरखास्ती मागची काही कारणं सांगणयात येत आहेत. दरम्यान. भारतीय कुस्ती संघटनेच्या निर्देशांचे पालन होत नसल्यामुळे राज्य कुस्ती परिषदे संलग्नता रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला होता. पण परिषदेकडून कोणतीही अपेक्षित हालचाल न झाल्यामुळे परिषद बरखास्त करण्याचा हा निर्णय घेण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Gangster Murder Mystery
Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com