Mahayuti : 'शिंदेंसाठी भाजपने त्याग केला'; शाहांचं वक्तव्य चर्चेत असतानाच बावनकुळेंचं मोठं विधान, म्हणाले "युतीत ताणतणाव..."

Maharashtra Vidhan sabha elections 2024 : "देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल ही तीनच महत्वाची पदे आहेत. बाकी गृहमंत्रीपदासह सर्व पदे फक्त काम होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं, तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला."
Eknath Shinde, Amit Shah, Chandrashekhar Bawankule
Eknath Shinde, Amit Shah, Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 16 Oct : "आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिले, तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला", असं म्हणत केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांना एकनाथ शिंदेंना विधानसभेच्या जागावाटपात थोडं झुकतं माप घेण्याचा सल्ला दिल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

शहांच्या या वक्तव्याची चर्चा सुरू असातानाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी देखील शहांच्या वक्तव्याची री ओढली आहे. एकनाथ शिंदे यांनी मोठं मन करून थोडा त्याग करावा, आम्ही थोडा करू, मात्र युती टिकवली पाहिजे असं बावनकुळेंनी म्हटलं आहे.

त्यामुळे आता जागावाटपावरून महायुतीत (Mahayuti) मतभेद आहेत का? शिंदेंनी मागितलेल्या जागा भाजप देण्यास राजी नाही का? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

त्यामुळे जागावाटपाचा मुद्दा शेवटच्या टप्प्यात आल्याचं महाविकास आघाडी आणि महायुतीकडूनही सांगितलं जात आहे. मात्र, दोन्हीकडे जागावाटपावरून वाद असल्याचं समोर येत आहे. अशातच आता महायुतीत घटकपक्ष असलेल्या शिवसेनेसाठी त्याग केल्याची भाषा भाजप (BJP) बोलू लागला आहे.

Eknath Shinde, Amit Shah, Chandrashekhar Bawankule
BJP Pune: इच्छुकांनी देव ठेवले पाण्यात; काही तासांतच पहिली यादी येणार; भाजप जुन्या-नव्यांचा समतोल साधणार?

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "अमित शाह एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) काय बोलले हे मला माहिती नाही. मात्र हे खरं आहे की मुख्यमंत्रिपद हे राज्याचं मुख्य असतं, ते सरकारचा चेहरा आहे. आमचा एकनाथ शिंदेंना आग्रह असतो की, आमचा पक्ष मोठा आहे. त्यामुळे थोडा जास्त हिस्सा मिळाला पाहिजे. कुणाचा त्याग किती याचा मीटर लावता येत नाही.

मात्र, त्यांनी मोठं मन करून थोडा त्याग केला पाहिजे, थोडा आम्ही करून युती टिकवली पाहिजे. त्यांनाही वाटतं की ते मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे जास्त जागा लढवल्या पाहिजेत. मात्र युतीत ताणतणाव ठेवून निवडणुकांना सामोरे जाता येत नाही. ज्या ठिकाणी आम्ही जिंकतो तिथे आम्हीच लढलं पाहिजे असा आग्रह आहे."

Eknath Shinde, Amit Shah, Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule: 'किती टप्प्यात निवडणूक घेतली म्हणजे महाविकास आघाडीचं समाधान होईल' ; बावनकुळेंचा टोला!

अमित शाह काय म्हणाले?

अमित शाह यांनी शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिल्याची आठवण करून देत तुमच्यासाठी आम्ही त्याग केल्याचं म्हटलं आहे. "देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल ही तीनच महत्वाची पदे आहेत. बाकी गृहमंत्रीपदासह सर्व पदे फक्त काम होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे.

आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं, तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला." असं शाह म्हणाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे ऐन जागावाटपात शिंदेंबाबत भाजप उपकाराची भाषा बोलत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर शिंदे आता जागापाटपात किती त्याग करणार हे पाहणं महत्त्वाच ठरणारं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com