Mahayuti CM Big Update: पुढील काही तासांत ठरणार महाराष्ट्राचा 'सीएम'! केंद्रीय निरीक्षकांनी दिली 'ही' मोठी माहिती

Mahayuti Government : महायुती सरकारचा ग्रँड शपथविधी सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या सोहळ्यासाठी भाजपसह एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही जोरदार तयारी केली आहे.
Devendra Fadnavis, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक बहुमत मिळून आता दहा दिवस उलटले आहेत. मात्र, तरीही मुख्यमंत्री चेहरा अद्याप ठरलेला नाही.महायुतीत दिवसागणिक नव्या घडामोडी,नाराजीनाट्य,दावे- प्रतिदावे याबाबतच्या चर्चांना प्रचंड वेग आला आहे. याचदरम्यान,आता ज्याकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राचा सीएम कोण असणार आहे याचं उत्तर बुधवारी (ता.4) मिळणार आहे.

एकीकडे महायुती सरकारच्या शपथविधीची तयारी सुरू असताना महाराष्ट्राचा सीएम ठरला नसल्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. पण आता मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा पुढील 24 तासांच्या आत जाहीर झालेला असणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय निरीक्षक म्हणून घोषणा झालेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पाठवण्यात आले आहे.

भाजपची बुधवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीतच भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाणार आहे. त्यानंतर भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना याबाबतची माहिती देण्यात येईल. विधीमंडळ नेत्याच्या निवडीनंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण यावर सस्पेन्स संपणार आहे.

Devendra Fadnavis, Eknath Shinde
Shivsena's Mission Mumbai : उद्धव ठाकरेंचे मिशन मुंबई महापालिका; या विश्वासू शिलेदारांवर सोपवली महत्वपूर्ण जबाबदारी

केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी हे आधीच मुंबईत दाखल झाले असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याही थोड्याच वेळात बैठकीसाठी दाखल होणार आहेत.याबाबत विजय रुपाणी यांनी मीडियाशी संवाद साधताना आपण मी मुंबईत जात असून निर्मला सितारमन याही मुंबईत येत आहेत.

बुधवारी सकाळी ११ वाजता होत असलेल्या महाराष्ट्र भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यात आम्ही चर्चा-विनिमय करणार आहोत. त्यानंतर सर्वसंमतीने विधिमंडळ पक्षनेत्याची निवड करण्यात येणार आहे. मुख्यमंत्रिपदासाठीची घोषणा करण्यापूर्वी पक्षश्रेष्ठींना संबंधित नावाची माहिती देण्यात येईल. त्यानंतर अधिकृतपणे महाराष्ट्राच्या सीएम पदाची घोषणा करण्यात येईल.

Devendra Fadnavis, Eknath Shinde
NCP Vs Shivsena : ऐन शपथविधीच्या तोंडावर अजितदादांच्या राष्ट्रवादीने शिंदेंच्या शिवसेनेवर टाकला आणखी एक बॉम्ब

आमच्या पक्षश्रेष्ठींनी महायुतीतील तीनही घटक पक्षांशी चर्चा केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण नाही. सर्वकाही सुरळीत आणि सर्वसंमतीने होणार आहे अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्राचे केंद्रीय निरीक्षक आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मांडली आहे.

महायुती सरकारचा ग्रँड शपथविधी सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या सोहळ्यासाठी भाजपसह एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.शपथविधी सोहळ्याची तयारी जोरदार सुरु आहे.या सोहळ्यासाठी 40 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Devendra Fadnavis, Eknath Shinde
Modi Government : एकनाथ शिंदे, नितीश कुमार अन् ‘दिल्ली फाईल्स’! हे कनेक्शन समजून घ्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह अनेक राज्याचे मुख्यमंत्री, साधुसंत या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. 'एक है तो सेफ हैं" आशयाचा मजकूर असलेले टी शर्ट परिधान केलेले 10 हजार कार्यकर्तेही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com